Multibagger Chemical Stock 2021 | 17 रुपये 40 पैशांचा हा स्टॉक 2,583 रुपयांचा झाला, गुंतवणुकदारांचे 1 लाख आज 1.48 कोटी झाले, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Chemical Stock 2021 | शेयर बाजार (Stock Market) मध्ये अनेक स्टॉक असे आहेत ज्यांनी आपल्या शेयरधारकांना मोठा रिटर्न (return) दिला आहे. आज आम्ही केमिकल स्टॉक दीपक नायट्रेट (Deepak Nitrite) बाबत जाणून घेणार आहोत. दीपक नायट्रेट 2021 मधील मल्टीबॅगर केमिकल स्टॉक (Multibagger Chemical Stock 2021) पैकी एक आहे.

मोठ्या कालावधीच्या गुंतवणुकदारांसाठी हा (Multibagger Chemical Stock 2021) स्टॉक या गोष्टीचे शानदार उदारहण आहे की स्टॉक मार्केट गुंतवणुकदारांच्या धैर्याचे फळ गोड असते.
कारण दीपक नायट्रेडचा शेयर (Deepak Nitrite share) आपल्या शेयर धारकांना शानदार रिटर्न देत आहे.
जर आपण दीपक नायरट्रेटची (Multibagger Chemical Stock 2021) शेयर हिस्ट्री पाहिली तर तो मागील वर्षात जवळपास 14,750 टक्के वाढला आहे.

Deepak Nitrite शेयर किमतीची हिस्ट्री

मल्टीबॅगर स्टॉक Deepak Nitrite च्या शेयर प्राईस इतिहासानुसार, हा मागील महिन्यात 2,434 रुपयांवरून वाढून 2,583 रुपये प्रति शेयर झाला आहे.
या कालावधीत जवळपास 6 टक्केची वाढ झाली आहे.
मागील 6 महिन्यात या केमिकल स्टॉकचे मुल्य जवळपास 1600 रूपयावरून 2583 रूपयांच्या स्तरापर्यंत वाढले आहे.
ज्यामुळे त्याच्या शेयरधारकांना जवळपास 60 टक्केचा रिटर्न मिळाला आहे.
अशाच प्रकारे, वर्ष-दर-वर्षाच्या कालावधीत, दीपक नायट्रेटच्या शेयरची किंमत 987 रूपयांवरून वाढून 2583 रूपये प्रति शेयर स्तरावर पोहचली आहे.
जी 2021 मध्ये जवळपस 160 टक्के वाढली (Multibagger Chemical Stock 2021) आहे.

 

गुंतवणुकदारांना झाला कोट्यवधीचा नफा

दीपक नायट्रेटच्या शेयर मूल्य इतिहासावरून संकेत घेता.
जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रूपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे त्याचे 1 लाख आज 1.06 लाख झाले असते.

गुंतवणुकदाराने 6 महिन्यांपूर्वी या केमिकल स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख रूपये आज 1.60 लाख झाले असते.

जर गुंतवणुकदाराने एक वर्षापूर्वी दीपक नायट्रेटच्या शेयरमध्ये 1 लाख रूपयांची गुंतवणूक केली असती तर,
त्याचे 1 लाख रूपये आज 3.60 लाख झाले असते.

अशाचप्रकारे जर एखाद्या गुंतवणुकदाराने 5 वर्षापूर्वी या रासायनिक स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 21 लाख रूपये झाले असते.

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 10 वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 17.40 च्या स्तरावर दीपक नायट्रेटचे शेयर खरेदी करत 1 लाखाची गुंतवणूक केली असती
तर त्याचे 1 लाख आज 1.48 कोटी झाले असते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Chemical Stock 2021 | multibagger stock 2021 deepak nitrite share 17 rupees 40 paisa to rs 2583 1 lakh become 1 84 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Digital Transaction On Whatsapp | बँक अकाऊंट लिंक न करता सुद्धा व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

Benefits of Black Pepper Tea | पोटाची चरबी कमी करायची असेल तर प्या काळी मिरीचा चहा, होतात अनेक जबरदस्त फायदे

Sangli-Kolhapur Four Lane Road | रस्त्याची दुरवस्था रोखण्यासाठी कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण