Multibagger Penny Stock | रु. 1.85 चा शेयर 97 रुपयांचा झाला, दिड वर्षात 1 लाखाचे झाले 52 लाख, दिला 5150% रिटर्न; तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | जर तुम्हाला शेयर बाजारात (Stock market) गुंतवणूक करायची असेल तर पेनी स्टॉक (Penny stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. पेनी स्टॉक असे स्टॉक (What is penny stock) असतात जे खुप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी असते. सध्या अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger Penny Stock) गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न (investment return) दिला आहे.

 

जोखीम सुद्धा तेवढीच जास्त
25 रुपयांपासूनच्या किमतीच्या स्टॉकला पेनी स्टॉक (penny stock) म्हणतात, यांची किंमत गुंवणुकदारांना आकर्षित करते, परंतु जोखीम सुद्धा तेवढीच जास्त असते.

 

1.5 वर्षात दिला 5150 टक्के रिटर्न
टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड (Tata Teleservices Ltd) च्या शेयर बाबत आपण आज जाणून घेणार आहोत. टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या शेयरने अवघ्या दिड वर्षात आपल्या शेयरधारकांना 5150 % रिटर्न दिला आहे.

 

1.85 रुपयांचा शेयर झाला 97 रुपयांचा
या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत रू. 1.85 (एनएसईवर 3 एप्रिल 2020 ला बंद किंमत) प्रति शेयर स्तरावरून वाढून रू. 97.25 (एनएसईवर 25 नोव्हेंबर 2021 ला बंद किंमत) झाली आहे.

मागील व्यवहाराच्या सत्रात, या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने 21.50 टक्केपर्यंत वाढ केली आहे, ज्याने सर्व सत्रांमध्ये 5 टक्केचे अपर सर्किट गाठले आहे. मागील एक महिन्यात, हा टेलीकॉम पेनी स्टॉक जवळपास 53 रुपयांवरून 97.25 रुपयांच्या स्तरापर्यंत वर गेला. या कालावधीत जवळपास 85 टक्केची वाढ नोंदली गेली. (Multibagger Penny Stock)

 

6 महिन्यात 600% रिटर्न दिला
मागील सहा महिन्यात, हा स्टॉक 13.55 रुपये प्रति शेयरच्या स्तरावरून वाढून 97.25 रुपये झाला आहे,
ज्याच्या शेयरधारकांना जवळपास 600 टक्के रिटर्न मिळाला आहे.

मागील एक वर्षात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक रू. 7.45 वरून रू. 97.25 च्या स्तरापर्यंत वाढला आहे,
या कालावधीत जवळपास 1200 टक्केची वाढ नोंदली गेली आहे.

 

1 लाखाचे झाले 52 लाखापेक्षा जास्त

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 7 लाख झाले असते.

अशाच प्रकारे जर एखाद्या गुंतवणुकदाराने दिड वर्षापूर्वी या टेलीकॉम पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख 52.50 लाख रुपये झाले असते.

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock 1 rs 85 paise to rs 97 surged up to 5152 percent return

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Legislative Council Elections | काँग्रेसचे सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, महाडिक यांची माघार

Maharashtra Rains | आगामी आठवडाभर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, IMD चा पुण्यासह 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

अवघ्या 22 हजारात 1 वर्षाच्या गॅरंटीसह खरेदी करा 82 kmpl मायलेजची Bajaj Discover 125, वाचा सविस्तर