Malegaon News | मालेगावात काँग्रेसला मोठा धक्का ! सोनिया गांधींच्या विश्वासू नेत्यासह 27 नगरसेवक राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Malegaon News | आगामी मार्च-एप्रिल महिन्यात राज्यातील काही जिल्ह्याच्या महापालिका निवडणुकीची (Municipal Elections) रणधुमाळी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे पक्षांतर होण्याचेही काम सुरू आहे. मालेगावमध्ये (Malegaon News) काँग्रेस पक्षात (Congress) गळती होण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विश्वासू नेत्यासह म्हणजे माजी आमदारासह तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम केला आहे. आणि हे नगरसेवक राष्ट्रवादीचं (NCP) घड्याळ हाती बांधणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नगरसेवक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत 27 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोडांवर असतानाच हा एक काँग्रेसला (Congress) मोठा धक्का आहे. माजी आमदार रशीद शेख (Rashid Sheikh), महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांच्यासह 27 नगरसेवक यांनी काँग्रेसला रामराम केले आहेत. येत्या 27 जानेवारीला सर्वजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती रशीद शेख यांनी दिली आहे. (Malegaon News)

दरम्यान, रशीद शेख (Rashid Sheikh) हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. तसेच रशीद शेख हे सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते.
दरम्यान, यापुर्वी माजी आमदार असिफ शेख (Asif Sheikh) यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
त्यानंतर आता त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख आई महापौर ताहेरा शेख सोबत 27 नगरसेवकही राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत.
काँग्रेसचेच कट्टर असणाऱ्यांनी पक्ष सोडल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे.

 

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock 2022 jainco projects india gives 1900 pc return in one year 1 lakh turn to 20 25 lakh rupee

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravi Shastri | रवी शास्त्री यांचे विराट कोहलीच्या बचावात मोठं वक्तव्य; ‘6 वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं एक जिंकला, म्हणून…’

 

Pune Corporation| पुणे मनपात समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पाणी टंचाई ! ‘राष्ट्रवादी’च्या वतीने महापालिकेत आंदोलन; अतिरिक्त आयुक्तांना प्रतिकात्मक टँकर भेट

 

PM Kisan Yojana | खुशखबर ! ‘या’ महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर होतील 11व्या हप्त्याचे 2000 रुपये, तपासून घ्या