Multibagger Penny Stock | 36 पैशांचा शेयर झाला 94 रुपयांचा, 1 लाख झाले 2.50 कोटींपेक्षा जास्त; तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | जर तुम्हाला शेयर बाजारात (Stock market) गुंतवणुक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. पेनी स्टॉक असे स्टॉक (What is penny stock) असतात जे खुप स्वस्त मिळतात आणि ज्यांचे बाजार मूल्य खुप कमी असते. सध्या अनेक पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना जबदस्त रिटर्न (investment return) दिला आहे.

 

प्रोसीड इंडियाच्या स्टॉकने सहा महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 26,122% रिटर्न दिला आहे. या पेनी स्टॉकची किंमत 19 मे 2020 रोजी 0.36 रुपये होती, जो 18 नोव्हेंबरला BSE वर 94.40 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला. सहा महिन्यापूर्वी प्रोसीड इंडिया स्टॉकमध्ये (procid india share price) गुंतवलेले 1 लाख रुपये आज 2.62 कोटी रुपये झाले आहेत. याच्या तुलनेत या दरम्यान सेन्सेक्स 19.50 टक्के वाढला आहे. (Multibagger Penny Stock)

 

मात्र, BSE वर हा शेयर 99.35 रुपयांच्या बंदच्या तुलनेत गुरुवारी 4.98% घसरून 94.40 रुपयांवर बंद झाला. मागील 4 सत्रांमध्ये स्मॉल कॅप शेयरमध्ये 18.48% ची घसरण आली आहे. हा स्टॉक 18 नोव्हेंबरला 4.98% च्या घसरणीसह खुला झाला आणि दिवसभराच्या व्यवहाराच्या सत्रादरम्यान त्याच स्तरावर अडकून राहिला. (Penny Stock)

 

फर्मचे मार्केट कॅप घसरून 973.22 कोटी रुपये राहिले. एक महिन्यात स्टॉकमध्ये 46.5% ची घसरण झाली. प्रोसीड इंडियाची भागीदारी या वर्षाच्या सुरूवातीपासून 24,742 टक्के वाढली आहे आणि एक वर्षात 31,366 टक्के वाढली आहे.

 

कंपनीचा व्यवसाय

कंपनी आपली स्टेप डाऊन सहायक कंपनी ग्लोब 7 पीटीई लिमिटेड (Globe 7 Pte Limited) ला वेब डेव्हलपमेंट,
वेब मेंटनन्स आणि सपोर्ट सेर्व्हिसेस प्रदान करते.
कंपनी दोन सेक्टर्स ऑनलाइन जाहिरात आणि सिक्युरिटएंड डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवर केंद्रित आहे. (Multibagger Penny Stock)

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock 36 paise to rs 94 surged up to 26122 percent in just 6 months

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Meghraj Rajebhosle | मेघराज राजेभोसले यांची ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

PAK MLA Sania Ashiq | महिला आमदाराचा कथित ‘अश्लील’ व्हिडीओ व्हायरल; प्रचंड खळबळ

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा