Multibagger Penny Stock | ‘या’ शेअरमुळे मिळतोय बंपर परतावा; 1 लाखांचे झाले 18 लाख, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Penny Stock | अनेक गुंतवणूकदार (Investors) चांगला परतावा मिळावा यासाठी अधिक परतावा देणा-या शेअर्सकडे लक्ष देत असतात. दरम्यान, असे अनेक मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Penny Stock) आहेत जे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देत असतात. दरम्यान, ज्यांनी 2021 साली गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिलाय. अशाप्रकारे आज एका पेनी मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती समोर आली आहे. यामधून मागील 18 महिन्यांत गुंतवणूकदारांना 1700 टक्के परतावा दिला आहे. एडविक कैपिटल (Advik Capital) शेअर्स असे या मल्टीबॅगर शेअरचे नाव आहे. एडविक कैपिटलच्या स्टॉकने गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये 18 लाख केले आहेत. याबाबत जाणून घ्या.

 

या स्टाॅकने साधारण 18 महिन्यांत गुंतवणूकदारांना 1700 टक्के परतावा दिलाय. याच काळात नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) 50 टक्के वाढला आहे, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) फक्त 48.5 टक्के दिलेत. हा पेनी स्टॉक 2022 साली मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आला. मागील एका आठवड्यामध्ये एडविक कैपिटलचा शेअर 4.68 रुपयांवरून 5.25 रुपयांपर्यंत वाढलाय. अर्थात मागील एका आठवड्यामध्ये साधारण बारा टक्क्यांनी वाढ झालीय. दरम्यान आज त्यामध्ये 4.97 टक्क्यांची घसरण झालीय. त्याची किंमत BSE वर 4.97 रुपये होती. (Multibagger Penny Stock)

हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 2.91 रुपयांवरून 5.25 रुपयांवर पोहोचलाय. म्हणजेच साधारण 80 टक्क्यांनी वाढ झालीय.
मागील 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर एडविक कैपिटलच्या शेअरच्या दरात 65 टक्क्यांनी वाढ झालीय.
मागील एका वर्षात हा पेनी स्टॉक (Penny Stock) 1.08 रुपयांवरून 5.25 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यामध्ये 385 टक्क्यांनी वाढ झालीय.

 

एडविक कैपिटलची किंमत BSE वर 29 ऑक्टोबर 2020 रोजी 29 पैसे होती, जी 12 एप्रिल 2022 रोजी वाढून 5.25 रुपये झाली आहे.
म्हणजेच या कालावधीत कंपनीने गुंतवणूकदारांना 1700 टक्के परतावा दिला आहे.
या कंपनीच्या शेअर्समध्ये महिन्याभराआधी कोणी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची गुंतवणूक 1.12 लाख रुपये झाली असती.

 

Advt.

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock advik capital turns 1 lakh to 18 lakh in 18 months

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा