Multibagger Penny Stock | ‘या’ स्टॉकने एक वर्षात 1 लाखाचे केले 83 लाख, शेयरमध्ये अजूनही तेजीत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | कोरोना महामारीच्या (Coronavirus) काळात भारतीय शेअर बाजाराने (Indian Stock Market) गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या दीड वर्षात असे अनेक शेअर्स आले आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे आणि ते मल्टीबॅगर शेयर (Multibagger Penny Stock) असल्याचे सिद्ध झाले आहे. पेनी स्टॉकनेही गुंतवणूकदारांचे खिसे भरण्यात मोठा हातभार लावला आहे. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे Digjam, जो गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर ठरला आहे.

 

8300 टक्के वाढ नोंदवली गेली
टेक्सटाइल इंडस्ट्रीजचा शेयर डिग्जम एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 3.80 रुपयांवरून 315.65 रुपयांपर्यंत वाढला आहे. या दरम्यान या शेअरमध्ये 8300 टक्कयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

1 फेब्रुवारी 2021 रोजी हा स्टॉक 3.80 रुपयांच्या पातळीवर होता. 7 जानेवारी 2022 रोजी बंद झालेल्या सत्रात डिग्जामचा स्टॉक 315.65 रुपयांच्या पातळीवर वाढला आहे.

आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर वाटचाल
गेल्या दीड महिन्यातील या समभागावर नजर टाकली तर तो प्रति शेअर 60 रुपयांवरून 315 रुपयांपर्यंत वाढला आहे. या काळात त्यात 500 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. (Multibagger Penny Stock)

 

जर तुम्ही 1 फेब्रुवारी 2021 रोजी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 83 लाख रुपये झाले असते. Digjam चा हा शेयर सध्या उच्च पातळीवर वाटचाल करत आहे.

 

पेनी स्टॉक्स म्हणजे काय? (What is Multibagger Penny Stock)
पेनी स्टॉक हे अत्यंत कमी मूल्याचे स्टॉक असतात. भारतीय शेअर बाजारातील पेनी स्टॉक्समध्ये 10 रुपयांच्या खाली असलेल्या शेअर्सचा समावेश होतो. तर पाश्चात्य बाजारात, 5 डॉलरच्या खाली असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात.

 

या प्रकारच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते. पण गेल्या दीड वर्षात काही पेनी स्टॉक्सनी भारतीय बाजारात जबरदस्त रिटर्न दिला आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock digjam has made 1 lac to 83 lac in one year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

 

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट आजचे दर

 

Coronavirus Maharashtra Police | राज्यातील 1 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण; काही IPS सह 316 अधिकार्‍यांना संसर्ग, 24 तासात 276 पोलिसांना लागण