Multibagger Penny Stock | 1 रुपया 93 पैशांचा ‘हा’ स्टॉक पोहचला 782 रुपयांवर, गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले 4 कोटी, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते. परंतु, जेव्हा कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि प्रॉफिटेबिलिटी दिसून येते, तेव्हा शेयरमध्ये गुंतवणूक करणे लाभाचे ठरू शकते. असे शेअर्स दीर्घकाळात उत्तम रिटर्न देऊ शकतात. जीआरएम ओव्हरसीज शेअर (GRM Overseas share) हे याचे ताजे उदाहरण आहे. (Multibagger Penny Stock)

 

या स्मॉल-कॅप राईस मिलिंग कंपनीच्या (small-cap rice milling company stock price) शेअरची किंमत गेल्या 10 वर्षांत रू. 1.93 वरून रू. 782.40 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत शेयरने आपल्या शेयरधारकांना सुमारे 40,450 टक्के रिटर्न दिला आहे.

 

GRM Overseas च्या share price वर एक दृष्टीक्षेप
हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या एका महिन्यात सुमारे रू. 505 वरून रू. 782 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 6 महिन्यांत अंदाजे रू. 156 वरून रू. 782 पर्यंत वाढला आहे.

 

या कालावधीत शेयरमध्ये सुमारे 400% वाढ झाली आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या एका वर्षात 34.44 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत शेयरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 2200 टक्के परतावा दिला आहे. (Multibagger Penny Stock)

 

त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक रू. 4.49 वरून रू. 782.40 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत स्टॉक सुमारे 17,325 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक रू. 1.93 (10 जानेवारी 2012 रोजी बंद किंमत) वरून रू. 782.40 (14 जानेवारी 2022 रोजी बंद किंमत) पर्यंत वाढला. या कालावधीत, या स्टॉकमध्ये जवळपास दशकभरात 405 पट वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फायदा

जीआरएम ओव्हरसीज शेअरच्या किमतीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 1.55 लाख झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या राईस मिलिंग पेनी स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 5 लाख झाले असते.

गेल्या 1 वर्षात गुंतवलेले 1 लाख रूपये रू. 23 लाखांवर गेले असते.

त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते आणि आजपर्यंत त्यात गुंतवणूक कायम ठेवली असती तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 1.74 कोटी झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते आणि एक स्टॉक रू. 1.93 च्या पातळीवर विकत घेतला असेल, तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 4.05 कोटी झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock grm overseas share has delivered 40450 percent return in 10 year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Jeevan Shiromani | ‘एलआयसी’चा सुपरहिट प्लान! केवळ 4 वर्षांपर्यंत द्यावा लागेल प्रीमियम, मिळेल 1 कोटी रुपयांचा फायदा

 

Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्षाला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले…

 

Pune Weekend Lockdown | ‘पुण्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी’ – उपमुख्यमंत्री अजित पवार (Video)