Multibagger Penny Stock | 6 रुपयांचा शेअर पोहोचला 188 रुपयांवर, 1 वर्षात 3 हजार टक्के रिटर्न; गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 31 लाख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Penny Stock | सर्वाधिक लोक व्यवसाय म्हणून शेअर मार्केटमध्ये उतरले आहेत. यामधूनच मागील काही महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी चांगला परतावा देखील मिळवला आहे. मागील काही वर्षामध्ये शेअर्सनी भागधारकांना 100 टक्के पेक्षा अधिक रिटर्न दिलेत. तर, यावर्षी मल्टीबॅगर शेअर्सच्या (Multibagger shares) यादीमध्ये फक्त लार्ज-कॅप, मिड-कॅप अथवा स्मॉल-कॅप स्टॉकचा समावेश नाही तर पेनी स्टॉकचाही (Investment in Penny Stock) समावेश आहे. JITF Infralogistics shares हा त्या मल्टीबॅगर पेनी स्टॉकपैकी एक आहे, याबाबत जाणून घ्या. (Multibagger Penny Stock)

 

JITF Infralogistics या शेअरने मागील एका वर्षामध्ये शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना शंभर टक्क्यांहून जास्त रिटर्न दिलंय.
या JITF Infralogistics च्या शेअरची किंमत प्रति शेअर 6.05 रुपये वरून 188 रुपये प्रति शेअर या स्तरापर्यंत वाढली आहे.
मागील एका वर्षामध्ये या शेअरने भागधारकांना 3 हजार टक्क्यांहून जास्त रिटर्न दिलं आहे.

 

या मल्टीबॅगर (Multibagger shares) पेनी स्टॉकच्या शेअर प्राइस इतिहासानूसार JITF Infralogistics चे शेअर्स मागील एका महिन्यापासून (Profit booking) च्या दबावाखाली आहेत.
हा शेअर 261.50 रुपये वरून 187.95 रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत कमी झाला आहे. या कालावधीत जवळपास 28 टक्के घट नोंदवली गेली आहे.
मागील सहा महिन्यांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 11.85 रुपये वरून 187.95 रुपये प्रति शेअर गेला.
या कालावधीत सुमारे दीड हजार टक्क्यांची वाढ या शेअरने केलीय. (Multibagger Penny Stock)

 

मागील काही वर्षामध्ये हा शेअर 12.80 रुपये वरुन 187.95 रुपये या स्तरावर पोहोचला आहे.
यंदा (2021) साली या शेअरने 1370 टक्क्यांची वाढ नोंदवलीय.
त्या कालावधीत हा स्टॉक 6.05 (NSE वर 22 नोव्हेंबर 2020 रोजी बंद दर) वरून 187.95 रुपये (NSE वर 22 नोव्हेंबर 2021 रोजी बंद किंमत) वर गेला आहे.
या कालावधीमध्ये 3 हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

गुंतवणूकदारांना अधिक लाभ –

 

जर एखाद्या गुंतवणूकदाराने (JITF Infralogistics shares) 1 महिन्यापूर्वी या काउंटरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती.
तर त्याचे 1 लाख रुपये आज 72 हजार रुपये झाले असते.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 16 लाख झाले असते.
JITF इन्फ्रालॉजिस्टिक्सचे शेअर्स 12.80 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करून जर एखाद्याने यावर्षीच्या प्रारंभी (2021) यामध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती.
तर त्याचे 1 लाख आज 14.7 लाख रुपये झाले असते.
त्याचप्रमाणे, एखाद्या गुंतवणूकदाराने हा शेअर 6.05 रुपये असताना खरेदी केला असता.
त्याने यात केलेली 1 लाखाचे गुंतवणूक आज 31 लाख रुपये झाली असती.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Penny Stock | multibagger penny stock jitf infralogistics gives 3000 percent return share price increase from rs 6 to 188

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा आहे गरोदर?, घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान प्रियंका म्हणाली, आम्ही अपेक्षा करतो…

Nashik Crime | किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

SBI ATM Franchise | घरबसल्या कमवा महिन्याला 60 हजार रुपये; जाणून घ्या ‘स्कीम’