Multibagger Penny Stock | दोन वर्षात 1 लाखाचे झाले 50 लाख रुपये, प्रचंड रिटर्न देतोय ‘हा’ ‘पेनी स्टॉक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | कोरोना महामारीच्या कहरातून सावरलेल्या शेअर बाजाराने (Stock Market) गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2021 मध्ये, भारतीय शेअर बाजाराने चांगल्या संख्येत मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Penny Stock) दिले आहेत. मल्टीबॅगर स्टॉक्सच्या या यादीमध्ये सर्व सेगमेंटमधील स्टॉकचा समावेश आहे.

 

2021 हे वर्ष लहान आणि पेनी स्टॉक्स (Penny Stocks) साठीही उत्तम ठरले कारण या बाजारातील रॅलीने हे सिद्ध केले आहे की पेनी स्टॉकमधील गुंतवणूक सामान्यपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकते. परंतु कंपनीचे फंडामेंटल मजबूत असावेत.

 

लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज (Lloyds Steels Industries) हा देखील असाच एक स्टॉक आहे ज्याने मागील वर्षात मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये उत्कृष्ट परतावा दिला आहे. हा मेटल स्टॉक जानेवारी मधील 0.50 रुपयांवरून 2020 मध्ये प्रति शेअर पातळी 24.95 पर्यंत वाढला आहे. या दोन वर्षांत या स्टॉकमध्ये सुमारे 4900 टक्के वाढ झाली आहे. (Multibagger Penny Stock)

 

लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज (Lloyds Steels Industries share price)
गेल्या एका आठवड्यात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 20.65 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. यामुळे लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांना सुमारे 21 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या एका महिन्यात, पेनी स्टॉकने रु. 10.80 ते रु. 24.95 अशी पातळी गाठल्यानंतर भागधारकांना सुमारे 130 टक्के परतावा दिला आहे.

 

गेल्या 6 महिन्यांत लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 3.45 रुपयांवरून 24.95 रुपये प्रति शेअर झाली. या कालावधीत स्टॉक सुमारे 625 टक्के वाढला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (multibagger penny stock) 1.00 प्रति शेअर वरून 24.95 रुपये प्रति शेअर इतका वाढला आहे. या कालावधीत सुमारे 2400 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

त्याचप्रमाणे, गेल्या दोन वर्षात मल्टीबॅगर पेनी स्टॉक 0.50 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो या काळात सुमारे 4900 टक्के आहे.

गुंतवणुकीचा प्रभाव

1 लाखाचे 1.21 लाख रुपये
– जर आपण लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा (Lloyds Steels Industries share) इतिहास पाहिला तर, नवीन वर्ष 2022 च्या सुरुवातीला जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे 1 लाख रुपये 1.21 लाख झाले आहेत.

 

1 लाखाचे 2.30 लाख रुपये
– जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते
तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.30 लाख रुपये झाले असते.

 

1 लाखाचे 25 लाख रुपये
– त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर आज त्याचे 1 लाख रुपये 25 लाख झाले असते.

 

1 लाखाचे 50 लाख रुपये
– तसेच एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 0.50 च्या पातळीवर 1 लाख रुपये गुंतवले
असते तर त्याचे 1 लाख आज सुमारे 50 लाख रुपये झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock lloyds steels industries share price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse Vs Girish Mahajan | ‘गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल’ – खडसे

 

लोन, गॅरंटी आणि वॉरंटी प्लानसह अवघ्या 2 लाखात ‘इथं’ मिळेल Maruti WagonR, पसंत न पडल्यास कंपनी परत करेल पूर्ण पेमेंट

 

Pune Crime | वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता