Multibagger Penny Stock | 19 रुपयांच्या शेयरने केली कमाल, 2 वर्षात 1 लाखाचे केले 33 लाख

नवी दिल्ली – Multibagger Penny Stock | जर तुम्हाला शेअर बाजारात (Stock market) गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉक (Penny stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. आजकाल अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा (investment return) दिला आहे. (Multibagger Penny Stock )

 

पेनी स्टॉक (What is penny stock) हे असे स्टॉक असतात जे खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी असते.

 

या कंपनीचा आहे हा शेयर

या शेयरची किंमत साधारणपणे रू. 25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांना खूप आकर्षित करतात. परंतु जोखीम सुद्धा तितकीच जास्त असते. मात्र, मजबूत फंडामेंटल असलेली छोटी कंपनी निवडल्यास चांगला डाव लावता येऊ शकतो. आदित्य व्हिजनचे शेअर्स हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

 

फक्त 2 वर्षात 19 रुपयांवरून 635 रुपये

हा पेनी स्टॉक रु. 19.20 (26 डिसेंबर 2019 रोजी बंद किंमत) वरून रु. 635.80 प्रति शेअर (4 जानेवारी 2022 रोजी बंद किंमत) पर्यंत वाढला आहे. दोन वर्षात सुमारे 3200 टक्के वाढ नोंदण्यात आली आहे.

 

2021 मध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक BSE SME स्टॉक जुलै 2021 मध्ये 1564.10 चा सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर विक्रीत राहिला.

 

आदित्य व्हिजन शेअर्सची प्राईस हिस्ट्री

बीएसईवर सूचीबद्ध हा स्टॉक गेल्या एका वर्षापासून डाउनट्रेंडमध्ये आहे कारण गेल्या एका महिन्यात यामध्ये सुमारे 18 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत, या मल्टीबॅगर पेनी स्टॉकलाही विक्रीचा सामना करावा लागला आणि सुमारे 2 टक्के घसरण झाली. (Multibagger Penny Stock )

 

एका वर्षात 1560 टक्के वाढ

तरीही, गेल्या एका वर्षात आदित्य व्हिजनचे शेअर्स 38.25 रुपयांवरून 635.80 रुपये प्रति शेअर झाले. या कालावधीत सुमारे 1,560 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या दोन वर्षात 19.20 रुपयांवरून 635.80 रुपयांपर्यंत वाढला.

 

गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले…

या मल्टीबॅगर शेअर्सच्या किमतीचा इतिहास पाहिला, तर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 82,000 रुपये झाले असते.

 

1 लाख झाले 33 लाख

मात्र, जर गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 16.60 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख वाढून 33 लाख झाले असते.

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock turns rupees 1 lakh to 33 lakh in 2 year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा