Multibagger Penny Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, काही महिन्यात 1 लाखाचे झाले 5.9 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन वर्षांत मोठी तेजी दिसून आली आहे. या काळात अनेक शेयर्सनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. याच काळात अनेक पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) मध्ये गुंतवणूक करणे लो लिक्विडिटीमुळे धोकादायक मानले जाते परंतु काही गुंतवणूकदार हा धोका पत्करतात आणि जास्त परताव्याच्या आशेने या शेयर्समध्ये गुंतवणूक करतात. (Share Market Marathi News)

 

असाच एक स्टॉक SEL Manufacturing Co. Ltd चा आहे, ज्याने अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न दिला आहे.

 

शेयरची प्राईस हिस्ट्री :
SEL Manufacturing Co. Ltd ने गेल्या 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. 27 ऑक्टोबर 2021 रोजी शेयरची किंमत 0.35 रुपये होती, जी 17 फेब्रुवारी 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर 209.85 रुपये होती. या आकडेवारीनुसार, स्टॉकने 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 59,857 टक्के रिटर्न दिला आहे.

 

गेल्या आठवड्यात SEL Manufacturing Co. Ltd मध्ये सतत अप्पर सर्किट लागत होते. 11 फेब्रुवारी 2022 रोजी शेअरची किंमत 172.75 रुपये होती, जी 17 फेब्रुवारी 2022 रोजी वाढून 209.85 रुपये झाली. अशा प्रकारे गेल्या आठवड्यात स्टॉकने 21.48 टक्के रिटर्न दिला आहे.

 

गेल्या 1 महिन्यात देखील या मल्टीबर्गर स्टॉकमध्ये चांगली तेजी आली आहे. 18 जानेवारी 2022 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर 75.60 रुपये होती, जी 17 फेब्रुवारी 2022 रोजी 209.85 वर पोहोचली. यावेळी शेयरने गुंतवणूकदारांना 177.58 टक्के रिटर्न दिला. (Multibagger Penny Stock)

 

या मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रूपयांच्या गुंतवणुकीला करोड रुपये केले आहेत, संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घेवूयात

1 लाखांवर गणना :
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 27 ऑक्टोबर 2021 रोजी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याची रक्कम 5.9 कोटी रुपये झाली असती.

एखाद्या गुंतवणूकदाराने 3 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम 21.50 लाख रुपये झाली असती.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये फक्त 1 महिन्यापूर्वी 1 लाख गुंतवले असते तर आज त्याची रक्कम 2.78 लाख रुपये झाली असती.

 

कंपनी प्रोफाईल :
एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडची स्थापना 1959 मध्ये झाली. कंपनी टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

#Multibagger Penny Stock    #Investment

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger stock sel manufacturing company ltd give multifold returns to investors

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन अश्लिल शिवीगाळ; धानोरीतील 28 वर्षीय तरूणीचा विनयभंग

 

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 30 वर्षीय तरूणीवर लवासा, लोणावळा येथे बलात्कार ! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

 

Pune Crime | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती रामण्णा कुसळकर, सासरे सुरेश कुसळकरला अटक; नवविवाहितेला मारहाण करुन केले प्रवृत्त