Multibagger Penny Stock | 5 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने केली कमाल, एका वर्षातच गुंतवणुकदार झाले मालामाल!

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Multibagger Penny Stock | असे तर, बहुतेक पेनी स्टॉक्सने (Penny Stocks) गुंतवणूकदारांना धक्का दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना नेहमी पेनी स्टॉकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. परंतु असे काही पेनी स्टॉक्स आहेत जे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देतात. (Multibagger Penny Stock)

खरं तर, अनेक वेळा पेनी स्टॉकचा परतावा पाहून गुंतवणूकदार आश्चर्यचकित होतात. असाच एक स्टॉक आहे, ज्याचे नाव चेन्नई फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (Chennai Ferrous Industries) आहे. या शेयरने गेल्या वर्षभरात उत्कृष्ट परतावा दिला आहे.

एका वर्षात जबरदस्त रिटर्न

Chennai Ferrous Industries च्या स्टॉकने एका वर्षात 1518 टक्के परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच 29 जानेवारी 2021 रोजी या स्टॉकची किंमत 5.75 रुपये होती, जी आता 93.05 रुपये झाली आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 29 जानेवारी 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर ती गुंतवणूक आता 15 लाखांपेक्षा जास्त झाली असती. म्हणजेच चेन्नई फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्टॉकने एका वर्षात 15 पट रिटर्न दिला आहे. (Multibagger Penny Stock)

गुंतवणूकदार मालामाल

एवढेच नाही तर या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 236 रुपये आहे, जो त्याने 28 ऑक्टोबर 2021 रोजी लावला केला होता. जर आपण या उच्च पातळीवरून मोजले तर, 29 जानेवारी 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये 28 ऑक्टोबर 2021 रोजी वाढून 45 लाख रुपये झाले असते.

सध्या Chennai Ferrous Industries लिमिटेडचे मार्केट कॅप 34 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
या कंपनीची स्थापना 2010 मध्ये झाली. चेन्नई फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड ही स्पंज आयर्नच्या निर्मितीमध्ये गुंतलेली कंपनी आहे.
जे लोह गंधकचा वापर करून तयार केले जाते. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title : Multibagger Penny Stock | penny stocks chennai ferrous industries
limited share bumper return last one year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या