Multibagger Penny Stock | 3 महिन्यात 1200% रिटर्न, 1 लाख रुपये झाले 13 लाख

नवी दिल्ली : Multibagger Penny Stock | साल 2021 भारतीय स्टॉक मार्केट (Indian Stock Market) आणि गुंतवणुकदारांसाठी खुप चांगले होते. या वर्षात अनेक स्टॉक मल्टीबॅगर बनले आहेत आणि त्यांनी गुंतवणुकदारांची झोळी भरली आहे. 3i Infotech सुद्धा एक असाच स्टॉक आहे. या पेनी स्टॉकने मागील 3 महिन्यांच्या आत 1200 टक्के रिटर्न दिला आहे. Mint च्या एका बातमी नुसार, या मल्टीबॅगर पेनी स्टॉकची (Multibagger Penny Stock) जर तुम्ही प्राईस हिस्ट्री चेक केली तर दिसेल की, त्याने मागील 5 दिवसात ट्रेडिंगदरम्यान 5 अपर सर्किट दिले आहेत.

 

मागील 5 दिवसात यामध्ये 21.50 टक्के वाढ झाली आहे. जर आपण एक महिन्याबाबत बोलायचे तर हा पेनी स्टॉक 35.85 रुपयांवरून वाढून 108.50 रुपयांपर्यंत पोहचला आहे. हे जवळपास 200% आहे.

 

अशाप्रकारे जर आपण मागील 3 महिन्याबाबत बोलायचे तर या स्टॉकने 8.48 रुपए प्रति शेयरने वाटचाल करण्यास सुरूवात केली होती. 27 ऑगस्ट 2021 च्या दिवशी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 3i Infotech ची किंमत रू. 9 सुद्धा नव्हती. (Multibagger Penny Stock)

 

26 नोव्हेंबरच्या दिवशी जेव्हा बाजारात भयंकर घसरण दिसून आली तेव्हा सुद्धा या स्टॉकने आपली दिशा बदलली नाही. हा शेयर आता रू. 108.50 वर ट्रेड करत आहे. जर आपण तो टक्केवारीत कॅलक्युलेट केला तर तो 1200% होतो.

 

1 लाखाचे 13 लाख

– 3i Infotech ने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीफोल्ड रिटर्न्स दिले आहेत.

– जर तुम्ही 1 आठवड्यापूर्वी यामध्ये रू. 1 लाख टाकले असते तर आता ते 1.21 लाख रुपये झाले असते.

– जर एखाद्याने 1 लाख रुपये एक महिन्यापूर्वी टाकले असते तर ते आतापर्यंत रू. 3 लाखात बदलले असते.

– जर 3 महिन्याच्या इन्व्हेस्टमेंटबाबत पाहिले तर 3 महिन्यापूर्वी जर कुणी रू. 1 लाख या स्टॉकमध्ये टाकले असते तर आतापर्यंत ते 13 लाख रुपये झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | this multibagger penny stock gives 1200 percent return in 3 month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा