
Multibagger Penny Stocks | ‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, एका वर्षात दिला 1900 टक्के रिटर्न
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stocks | शेअर बाजारातील पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे नेहमीच धोक्याचे मानले जाते. पण ज्या गुंतवणूकदारांना शेअरची सखोज माहिती असते ते चांगल्या रिटर्नसाठी कमी लिक्विडीटी असलेल्या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. अनेकदा हे पेनी स्टॉक्स गुंतवणुकदारांना खूप कमी कालावधीत चांगला रिटर्न देतात सिंधू ट्रेड लिंक लिमिटेड (Sindhu Trade Link Limited) हे असेच एक उत्तम उदाहरण आहे. ज्याने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला नफा मिळवून दिला आहे. (Multibagger Penny Stocks)
5 वर्षात दिला 8100 टक्के परतावा :
सिंधू ट्रेड लिंक लिमिटेडने गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 8100 टक्के रिटर्न दिला आहे. या कालावधीत 17 फेब्रुवारी 2017 रोजी शेअरची किंमत 1.69 रुपये होती. त्याच वेळी, 15 फेब्रुवारी 2022 रोजी बाजार बंद होईपर्यंत, शेअरची किंमत 135.75 रुपयांवर पोहोचली. याबाबतीत गेल्या 5 वर्षात हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे.
एका वर्षात दिला 1900 टक्के रिटर्न :
गेल्या 1 वर्षाबद्दल बोलायचे तर, सिंधू ट्रेड लिंक लिमिटेडने गुंतवणूकदारांना चांगला नफा दिला आहे. या कालावधीत शेयरने सुमारे 1900 टक्के रिटर्न दिला आहे. 16 फेब्रुवारी 2021 रोजी बीएसईवर शेअरची किंमत 6.93 रुपये होती. तर 16 फेब्रुवारी 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर शेअरची किंमत 135.75 रुपये झाली. (Multibagger Penny Stocks)
1 लाख गुंतवणुकीची गणना :
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी 16 फेब्रुवारी 2021 रोजी 6.93 रुपये प्रति शेअर या दराने 1 लाख रुपये सिंधू ट्रेड लिंक लिमिटेडमध्ये गुंतवले असते, तर आज त्याची गुंतवणूक 16 फेब्रुवारी 2022 रोजी 135.75 रुपये प्रति शेअर या दराने 19,58,874 रुपये झाली असती.
त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी 17 फेब्रुवारी 2017 रोजी 1.69 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याची गुंतवणूक 135.75 रुपये प्रति शेअर दराने 80,32,544 रुपये झाली असती.
सिंधू ट्रेड लिंक लिमिटेडची आर्थिक स्थिती :
गेल्या 1 वर्षात सिंधू ट्रेड लिंक लिमिटेडच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. कंपनीने तोट्यातून नफ्यात आली आहे.
डिसेंबर 2021 च्या तिमाहीत बीएसईला कळवलेल्या आकडेवारीनुसार, कंपनीचे उत्पन्न रु. 282 कोटी होते आणि नफा रु. 28 कोटी होता.
तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न 208 कोटी रुपये आणि तोटा नऊ कोटी रुपये होता.
सिंधू ट्रेड लिंक लि.चे शेअरहोल्डिंग :
कंपनीमध्ये प्रमोटर्सकडे 74.97 टक्के हिस्सा आहे. उर्वरित 25.03 टक्के शेयरपैकी 24.97 टक्के हिस्सा लोकांकडे
आणि 0.25 टक्के परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे (FII) आहे.
Web Title :- Multibagger Penny Stocks | multibagger penny stock turns 1 lakh into 19 lakhs in just one year Sindhu Trade Link Limited
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update