Multibagger Stock | 4 रुपये 81 पैशावरून 787.40 रुपयावर पोहचला हा शेयर ! 1 लाख झाले 1.63 कोटी रुपये, आली 163 पट जबरदस्त ‘तेजी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | सध्या शेयर बाजार (Stock Market) नवी विक्रमांवर आहे. अनेक छोटे-मध्यम शेयर्स मल्टीबॅगर (Multibagger Stock) ठरत आहेत. असाच एक मल्टीबॅगर शेयर अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) चा आहे. अ‍ॅक्सिस बँकेचा शेयर मागील 20 वर्षात 4.81 रुपयातून वाढून 787.40 रुपयांवर पोहचला आहे. या कालावधीदरम्यान हा शेयर 163 पट वाढला आहे.

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) शेयर मूल्य इतिहास

या मल्टीबॅगर स्टॉकने मागील एक महिन्यापासून आपल्या गुंतवणुकदारांना सध्या कोणताही रिटर्न दिलेला नाही.

मात्र, मागील 6 महिन्यांत एनएसईवर अ‍ॅक्सिस बँकेच्या शेयरची किंमत 635 रुपयांनी वाढून 787 रुपये (11 ऑक्टोबर 2021 ला एनएसईवर प्राईस) प्रति शेयर स्तरावर पोहचली आहे.
या कालावधीत गुंतवणुकदारांना जवळपास 25 टक्के रिटर्न मिळाला आहे.

1 वर्षात 70% वाढ

एका वर्षात हा बँकिंग स्टॉक 468 रुपयांवरून 787.4 रुपयांच्या स्तरापर्यंत वाढला आणि या कालावधीत जवळपास 70 टक्के उडी घेतली.
मागील 5 वर्षात अ‍ॅक्सिस बँकेचा शेयर 520.65 वरून वाढून 787.40 रुपयांवर पोहचला, या दरम्यान 51 टक्केची वाढ झाली आहे.
अशाप्रकारे मागील 10 वर्षामध्ये या शेयरने 250 टक्के रिटर्न दिला.

4.81 रुपयांपासून 787.40 रुपयांवर पोहचला शेयर

अशाप्रकारे हा मल्टीबॅगर स्टॉक 4.81 रुपये (12 ऑक्टोबर 2001 ला एनएसईवर बंद किंमत) वरून वाढून 787.40 रुपये झाला आहे.
(11 ऑक्टोबर 2021 ला एनएसईवर बंद किंमत). या दोन दशकांत जवळपास 163 पट वाढला हा स्टॉक.

 

6 महिन्यात 1 लाख झाले 1.25 लाख रुपये

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.25 लाख झाले असते.
अशाच प्रकारे जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक वर्षापूर्वी अ‍ॅक्सिस बँकच्या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 1.70 लाख झाले असते.

1 लाख झाले 1.63 कोटी रुपये

अशाप्रकारे, जर गुंतवणुकदाराने 20 वर्षापूर्वी अ‍ॅक्सिस बँकेच्या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज या बँकिंग स्टॉकमध्ये त्याचे 1 लाख 1.63 कोटी रुपये झाले असते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stock | axis bank multibagger stock jumps 163 times from 4 to 787 rupees check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | सुप्रसिध्द अमर बिल्डर्सची 5 कोटींची फसवणूक ! अ‍ॅड. पराग देशपांडेविरुद्ध गुन्हा; धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नावाचा केला गैरवापर

PM Narendra Modi | मानवाधिकाराच्या नावावर काही लोक खराब करतात देशाची प्रतिमा, राहावे लागेल सावध – पीएम नरेंद्र मोदी

Akshay Kumar | अक्षय कुमारचे ‘रक्षा बंधन’ पूर्ण झाले ‘नवरात्री’मध्ये