Multibagger Stock | 12 रुपयांनी वाढून 2000 रूपये झाला ‘हा’ स्टॉक, 13 वर्षात 1 लाख झाले 1.64 कोटी

0
56
NPS Or EPF Which Is Better nps or epf which is better for your retirement planning
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | शेअर बाजारातील (Stock Market) चढ-उतार सुरूच आहे. कधी तेजी तर कधी मंदी हे शेअर बाजाराचे चक्र वर्षानुवर्षे सुरू असते. अशावेळी केवळ तेच गुंतवणूकदार शेअर बाजारातून बंपर रिटर्न मिळवतात, जे चांगल्या कंपन्यांमध्ये संयमाने गुंतवणूक करून दीर्घकाळ टिकतात. अशा कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देतात, शिवाय केवळ काही लाखांवर करोडोंचा फायदा देऊन जातात. (Multibagger Stock)

 

आज आम्ही अशाच एका कंपनीबद्दल सांगत आहोत ज्याने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (Balkrishna Industries Limited) ही अशीच एक कंपनी आहे, जिने गेल्या 13 वर्षांत गुंतवणूकदारांना 16,320 टक्के रिटर्न दिला आहे. (Share Market Marathi News)

 

Balkrishna Industries Limited शेअर प्राईस हिस्ट्री :
गेल्या सहा महिन्यांत शेअर बाजारात घसरण झाली आहे. जर गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे तर, बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 2327 वरून सुमारे रू. 2000 पर्यंत घसरली आहे, या दरम्यान गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये सुमारे 14% गमावले आहेत. (Multibagger Stock)

 

गेल्या 1 वर्षातील या शेअरच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, कंपनीचा शेअर 1640 रुपये प्रति शेअरवरून 2000 रुपये प्रति शेअरवर बंद झाला आहे.

 

या कालावधीत शेअर सुमारे 22 टक्क्यांनी वधारला. गेल्या 5 वर्षाबद्दल सांगायचे तर, हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे, दरम्यानच्या काळात शेअरची किंमत 700 रुपयांवरून 2000 रुपये प्रति शेअर झाली आहे. अशा प्रकारे शेअरने गुंतवणूकदारांना 185 टक्के रिटर्न दिला आहे.

 

गेल्या 10 वर्षातील शेअरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, शेअरची किंमत 125 रुपयांवरून 2000 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीत, शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के बंपर रिटर्न दिला आहे. गेल्या 13 वर्षांच्या शेअरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, हा शेअर रु. 12.18 वरून रु. 2000 पर्यंत वाढला आहे. या काळात या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना 164 पट रिटर्न दिला.

गुंतवणुकीवर कॅलक्युलेशन :

– जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची एक लाखाची गुंतवणूक 80 हजार रुपये झाली असती.

एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 1.22 रुपये झाली असती.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 2.85 लाख रुपये झाली असती.

एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 16 लाख रुपये झाली असती.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 13 वर्षांपूर्वी या 12.18 रुपये किंमतीवर शेअरमध्ये एक लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम रु. 1.64 कोटी झाली असती.

 

कंपनीची प्रोफाईल :
बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (Balkrishna Industries Limited) ही मुंबई येथील एक भारतीय बहुराष्ट्रीय टायर उत्पादन कंपनी आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज औरंगाबाद, भिवडी, चोपंकी, डोंबिवली आणि भुज येथे असलेल्या पाच कारखान्यांमध्ये खाणकाम, अर्थमूव्हिंग, कृषी आणि फलोत्पादन यासारख्या क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या ऑफ-हायवे टायरचे उत्पादन करते. कंपनी जगातील 5 खंडातील 160 देशांमध्ये टायर विकते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | balkrishna industries share turned 1 lakh into 1 64 crore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepika Padukone Bikini Bold Photos | दीपिका पादुकोनचे हॉट फोटो झाले लीक, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

 

Sharad Pawar | नवाब मलिकांबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय?, बैठकीत एकमत झाले?

 

Gold-Silver Price Today | सोने झाले महाग, चांदीची सुद्धा वाढली चमक; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर