Multibagger Stock | 3 महिन्यात 300% वाढला ‘या’ बासमती तांदळाच्या कंपनीचा स्टॉक, तुम्ही खरेदी केला आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | कोरोना महामारीच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि नंतर तेवढ्याच वेगाने रिकव्हरी झाली. यामुळे, गेल्या वर्षी 2021 मध्ये मोठ्या संख्येने शेयर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला. जीआरएम ओव्हरसीज ही अशीच एक कंपनी आहे जी परदेशात बासमती तांदूळ निर्यात करते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर सूचीबद्ध असलेल्या या कंपनीचे शेअर्स गेल्या 3 महिन्यांत जवळपास 300% वाढले आहेत. (Multibagger Stock)

 

11 ऑक्टोबर 2021 रोजी GRM ओव्हरसीजच्या शेअरची किंमत 209.28 रुपये होती, जी आता जवळपास 300 टक्क्यांनी वाढून 815.35 रुपये प्रति शेअर झाली आहे. ऑक्टोबरमध्ये हा स्टॉक स्लिप्ट झाला होता आणि 1:5 या प्रमाणात विभाजित झाला होता.
तेव्हापासून त्याचे भाव सतत वाढत आहेत.

 

बासमती निर्यात करणार्‍या कंपनीने अलीकडेच उडान (Udaan) या भारतातील सर्वात मोठ्या बिझनेस-टू-बिझनेस (B2B) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसोबत कराराची घोषणा केली आहे.
या करारांतर्गत त्यांची उपकंपनी GRM Foodkraft Pvt. Ltd (GFK) चे राईस ब्रँड या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. (Multibagger Stock)

GRM ओव्हरसीज शेअर प्राईस हिस्ट्री
GRM ओव्हरसीजचा गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न देण्याचा इतिहास आहे.
गेल्या एका महिन्यात, शेअरची किंमत रु. 459.50 वरून रु. 815.35 प्रति शेअर झाली आहे आणि या कालावधीत गुंतवणूकदारांना 75% रिटर्न दिला आहे.

 

त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, हा स्टॉक 160 रुपयांवरून 815.35 रुपयांपर्यंत वाढला आहे.
आणि या काळात त्याने सुमारे 400% चा मजबूत रिटर्न दिला आहे.

 

त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षात, जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरची किंमत 38 रुपयांवरून 815 रुपयांपर्यंत वाढली आहे आणि गुंतवणूकदारांना 2,000 रुपयांचा बंपर रिटर्न दिला आहे.

 

गुंतवणुकीवर परिणाम
1]
जर तुम्ही GRM ओव्हरसीजच्या शेअरच्या किमतीचा इतिहास पाहिला तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख रुपये 1.75 लाख रुपये झाले असते.

2] जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 5 लाख रुपये झाले असते.

3] त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आज 21 लाख रुपये झाले असते.

 

Web Title :-  Multibagger Stock | basmati rice company grm overseas stock zooms 300 percent in 3 months do you own

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Link Aadhaar To Voter ID | केवळ एका SMS ने लिंक होईल वोटर आयडी कार्ड आणि आधार, 1950 वर कॉल करून सुद्धा मिळवू शकता ‘ही’ मोठी सुविधा

 

Girish Mahajan | पुणे पोलिसांनी जळगावमधून महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात, गिरीश महाजन अडचणीत येणार?

 

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा पलटवार, म्हणाले – ‘कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?’