Multibagger Stock | वर्षभरात 50 पट रिटर्न, ‘या’ पेनी स्टॉकने 1 लाख रुपयांचे केले 50 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंगसारख्या सेवा पुरवणार्‍या Flomic Global Logistics कंपनीने शेअर बाजारात रिटर्न देण्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांना मात दिली आहे. गेल्या 1 वर्षात या स्टॉकने आश्चर्यकारक उड्डाण घेतले आहे. या 1 वर्षात हा शेयर सुमारे 5,000 टक्के वाढला आहे. (Multibagger Stock)

 

गेल्या वर्षी 8 फेब्रुवारीला हा स्टॉक फक्त 2.93 रुपये होता. सध्या तो BSE वर 145 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. हा एका वर्षात 4,900 टक्क्यांहून अधिक रिटर्न आहे. या कालावधीत सेन्सेक्स केवळ 13.41 टक्क्यांनी वाढला आहे. सेन्सेक्स BSE वर सूचीबद्ध 30 सर्वात मोठ्या कंपन्यांचा इंडिकेटर आहे.

 

याचा अर्थ असा की देशातील 30 मोठ्या सार्वजनिक कंपन्यांचे शेअर्स 1 वर्षात 13.41 टक्के रिटर्न देऊ शकले आहेत, तर या पेनी स्टॉकने अनेक पटींनी भरघोस रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या पोर्टफोलिओचे मूल्य सुमारे 50 लाख रुपयांनी वाढले असते. आजही बाजार लक्षणीय खाली असताना, हा पेनी स्टॉक ग्रीन स्थितीत आहे. BSE वर, हा शेअर सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह 145 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.

BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्या या कंपनीचे एमकॅप सुमारे 100 कोटी रुपये आहे. हा शेयर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 216 रुपयांवर पोहोचला होता. दोन प्रमोटर्सकडे कंपनीत 27.49 टक्के हिस्सा आहे. सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीत 72.51 टक्के हिस्सा आहे. 9,829 सार्वजनिक शेयरधारकांकडे कंपनीचे 52.20 लाख शेयर आहेत.

 

सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला नफ्यातील घटचा सामना करावा लागला.
सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 17.65 टक्क्यांनी घसरून 0.70 कोटी रुपयांवर आला आहे.
तर, विक्री 100 टक्क्यांनी वाढून 80.44 कोटी रुपये झाली आहे. कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत.
मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 5,040 टक्क्यांनी वाढून 2.47 कोटी रुपये झाला आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | best multibagger stocks penny shares list multiple return bumper earning investors

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा