Multibagger Stock | 4 रुपयांवरून 4000 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेअर, 1 लाखाचे झाले 10 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | सॅनिटरीवेअर उद्योगाशी संबंधित एका कंपनीच्या शेअर्सचे रुपांतर 1 लाख कोटींमध्ये झाले आहे. कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त रिटर्न दिला आहे. ही कंपनी सेरा सॅनिटरीवेअर (Cera Sanitaryware) आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 4 रुपयांवरून 4,000 रुपयांवर गेले आहेत. (Multibagger Stock)

 

या कालावधीत कंपनीच्या शेअरनी गुंतवणूकदारांना 95,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3,518.60 रुपये आहे. (Share Market Marathi News)

 

1 लाखाचे झाले 10 कोटीपेक्षा जास्त
23 मे 2003 रोजी सेरा सॅनिटरीवेअरचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर 4 रुपयांच्या पातळीवर होते. 20 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 4,025 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअरनी 95,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

जर एखाद्या व्यक्तीने 23 मे 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 10 कोटींपेक्षा जास्त झाली असती. सेरा सॅनिटरीवेअर शेअर्स 6,430.45 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. (Hotstocks)

26 रुपयांवरून 4,000 रुपयांच्या पुढे गेले शेअर्स
Cera Sanitaryware चे शेअर्स 2 एप्रिल 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) वर रु. 26 वर ट्रेडिंग करत होते. 20 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 4,025 रुपयांवर बंद झाले.

 

जर एखाद्या व्यक्तीने 2 एप्रिल 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता ही रक्कम 1.54 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.

 

या शेअरनी यावर्षी आतापर्यंत 19 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअरनी गेल्या 6 महिन्यांत 21 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिला आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | cera sanitaryware share delivered more than 95000 percent return

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hot Stocks | अदानींच्या नावाशी जोडले जाताच हे शेअर बनले रॉकेट, 6 रुपये आणि 30 रुपयांचे हे शेअर खरेदी करण्याची चढाओढ

 

Welspun Corp Share | ₹ 5000 कोटीची ऑर्डर मिळाल्यानंतर ‘या’ कंपनीचे शेअर बनले रॉकेट, 19% पर्यंत वाढले स्टॉक

 

RBI New Rule | आता विना कार्ड सुद्धा ATM मधून काढू शकता पैसे, RBI ने लागू केला नवीन नियम; जाणून घ्या प्रक्रिया