Multibagger Stock | ‘या’ ग्रीन एनर्जी शेयरने भरली गुंतवणुकदारांची झोळी, एका वर्षात दिला 42 पट रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | शेयर बाजारात ग्रीन एनर्जी (Green energy) कंपन्या गुंतवणुकदारांना जोरदार संधी देत आहेत. त्यांनी गुंतवणुकदारांचा पैसा 42 पट वाढवला आहे. अशीच एक कंपनी आहे जिचे नाव गीता रिन्यूएबल एनर्जी (Gita Renewable Energy) आहे. जिचा शेयर एक वर्षापूर्वी 6 रुपयांपेक्षा सुद्धा कमी होता, जो सध्या 230 रुपयांवर गेला आहे. याचा अर्थ आहे की कंपनीच्या शेयरने मागील एक वर्षात सुमारे 42 पट रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

मागील पाच व्यवहारांच्या सत्रात लावले 5 टक्केचे अप्पर सर्किट

या मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) च्या शेयर प्राईस हिस्ट्रीनुसार, मागील आठवड्यात सर्व व्यवहाराच्या सत्रात या शेयरने 5 टक्केचे सर्किट लावले आहे.
या कालावधीत 21.50 टक्के वाढ पहायला मिळाली.
हा 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) मागील एक महिन्यात 88.20 रुपयांवरून 233.50 रुपयांपर्यंत वाढला आहे.
कालावधीत जवळपास 165 टक्के वाढ झाली आहे.
अशाप्रकारे मागील 6 महिन्यात हा उर्जा स्टॉक 29.40 रुपयांनी वाढून 233.50 रुपये प्रति शेयरवर आला आहे.
दरम्यान कंपनीने गुंतवणुकदारांना जवळपास 695 टक्के रिटर्न दिला आहे.


एका वर्षात 42 पट रिटर्न

अशाप्रकारे हा मल्टीबॅगर स्टॉक 7.36 रुपयांवरून वाढून 233.50 रुपये झाला, याचा अर्थ आहे की, यावर्षी कंपनीच्या शेयरमध्ये जवळपास 3230 टक्केपर्यंतची वाढ दिसून आली.
हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) बीएसईवर 13 ऑक्टोबर 2020 ला 5.52 रुपये प्रति शेयरवर बंद झाला होता.
तर हा बीएसईवर 14 ऑक्टोबर 2021 ला 233.50 रुपयांवर बंद झाला होता.
याचा अर्थ आहे की मागील एक वर्षात जवळपास 42 पट किंवा 4130 टक्केची वाढ पहायला मिळाली.

एक आठवड्यात 1 लाखाचे झाले 1.21 लाख

गीता रिन्यूएबल एनर्जीच्या (gita renewable energy ltd)शेयर प्राईस (gita renewable energy ltd share price) हिस्ट्रीचा संकेत पाहून जर एखाद्या
गुंतवणुकदाराने एक आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आज 1.21 लाख रुपये झाले असते.

 

एक महिन्यात 1 लाखाचे झाले 2.65 लाख

जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक महिन्यापूर्वी या शेयरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याची व्हॅल्यू आज 2.65 लाख रुपये झाली असती.

6 महिन्यात 1 लाखाचे झाले 7.95 लाख

अशाचप्रकारे जर गुंतवणुकदाराने 6 महिन्यापूर्वी या काऊंटरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज ते 7.95 लाख झाले असते.

1 वर्षात 1 लाखाचे झाले 42.30 लाख

जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 5.52 प्रति शेयरवर गीता रिन्यूएबल एनर्जीचे शेयर खरेदी करण्यासाठी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आज 42.30 लाख रुपये झाले असते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stock | gita renewable energy ltd green energy stock filled the bag of investors gave 42 times return in one year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | विजयादशमीनिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुबंड; 400 कोटींचा टप्पा पार

Nitesh Rane | दसरा मेळाव्यानंतर नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात’

Modi Government | नोकरीसोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 1 लाख रुपयांपर्यंत होईल नफा; मोदी सरकारकडून मिळेल 80% कर्ज