Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल ! अवघ्या 35 पैशाच्या स्टॉकने दिला 5 कोटींचा रिटर्न; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Stock | शेअर बाजारामुळे अनेक गुंतवणूकदार (Investors) मालामाल झाले आहेत. कमी गुंतवणूक आणि अधिक परतावा मिळावा यासाठी गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या असतात. सध्या शेअर बाजारात (Stock Market) तेजी निर्माण झाली आहे. याच काळात आता कमी दराचे शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर (Multibagger Stock) ठरल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. यापैकी महत्वाचा एक स्टॉक ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स’ (Flomic Global Logistics) आहे. या स्टॉक बाबत सविस्तर जाणून घ्या. (Share Market Marathi News)

 

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स (Flomic Global Logistics) या स्टॉकने मागील सात ते आठ महिन्यामध्ये केवळ सात रुपयांवरून तब्बल 216 रुपयांवर मजल मारली आहे. दोन वर्षापूर्वी हा स्टॉक 35 पैसे इतका होता. आता हा स्टॉक 130 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. साधारण 2 वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक 409 पटींने वाढलाय. 2 वर्षापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक 5 ते 6 कोटींची झाली असती. (Multibagger stock)

 

दरम्यान, 28 मार्च 2019 ला BSE इंडेक्स वर स्टॉकचा दर 0.35 रुपये होती. सध्या हा स्टॉक 130 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. जुन 2021 साली या शेअरची किंमत 7.62 रुपये होती. ती सध्या 130 रुपयांपर्यंत आहे. या शेअरने ऑक्टोबर 2021 साली 215 रुपयांचा उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यानंतर शेअरमध्ये मोठे उतार चढ पाहायला मिळाले. दरम्यान, रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धामुळे थोडा फटका स्टॉकलाही बसला आहे.

या दरम्यान, 2021 साली स्टॉक 1.95 रुपयांच्या तुलनेत आता 130 रुपयांवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ कंपनीने आपल्या शेअर धारकांना जवळपास 7 हजारहून जादा टक्क्यांचा परतावा दिलाय. त्याचबरोबर आठ महिन्याआधी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे 18.57 लाख झाले असते. एका वर्षापूर्वी गुंतवणूकदारांनी एक लाखाची गुंतवणूक केली असती तर आज एक कोटीहून जादा रुपये झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Web Title :- Multibagger Stock | high return penny stock 35 paise flomic global logistics stock gave crores of returns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामामुळे ‘फुटली’ होती जलवाहीनी ! डेक्कन, प्रभात रस्त्यावरील कमी दाबाने होणार्‍या पाणी पुरवठ्याचा उलगडा झाला

 

Herschelle Gibbs | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी ! सौरव गांगुली आणि जय शहांवर ‘या’ माजी क्रिकेटपटूने केला खळबळजनक आरोप

 

Ajit Pawar on Yashwant Jadhav IT Raids | यशवंत जाधवांच्या डायरीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘बरेच जण आपल्या आईला मातोश्री म्हणतात’