Multibagger Stock | ‘या’ औषध कंपनीने गुंतवणुकदारांना दिले ‘मनी टॉनिक’, 6 महिन्यात 10 हजाराचे केले 1.62 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | कोरोना काळात अनेक कंपन्यांच्या शेयरने जबरदस्त रिटर्न दिला आहे. गुंतवणुकदारांनी सुद्धा शेयर बाजारातून मोठी कमाई केली आहे. परंतु, एका फार्मा कंपनीने गुंतवणुकदारांच्या नुकसानीवर मलम लावण्याचे काम केले आहे. क्वालिटी फार्मा (kwality Pharma) कंपनीने 6 महिन्यात 1500 टक्केपेक्षा जास्त रिटर्न (Multibagger Stock) दिला आहे.

आजसुद्धा कंपनीच्या शेयरमध्ये 5 टक्केचे अपर सर्किट (Stock Market) आहे आणि आपल्या ऑल टाइम हायपासून सुमारे 70 रुपये दूर आहे. जाणकारांनुसार आगामी काळात या शेयरमध्ये आणखी तेजी पहायला मिळू (Multibagger Stock) शकते.

6 महिन्यांपूर्वी अवघा 53 रुपयांचा होता शेयर
अवघ्या 6 महिन्यांपूर्वी म्हणजे जेव्हा कोरोनाची दुसरी लाट देशात आली होती तेव्हा बाजारावर (Share Market) त्याचा परिणाम स्पष्ट दिसून येत होता. ज्यामुळे क्वालिटी फार्मा कंपनी (Kwality Pharma Company) चा शेयर 53 रुपयांवर दिसून येत होता. यानंतर या शेयरने जो वेग पकडला तो अजून थांबण्याचे नाव घेत नाही.

आज कंपनीचा शेयर पाच टक्केच्या अपर सर्किटसह 857.70 रुपयांवर व्यवहार करत आहे. याचा अर्थ आहे की काल म्हणजे सोमवारच्या तुलनेत या शेयरमध्ये 40.80 रुपयांची तेजी पहायला मिळत (Multibagger Stock) आहे.

1500 टक्केपेक्षा जास्त रिटर्न
कंपनीच्या वेगाचा अंदाज यावरून येऊ शकतो की कंपनीचा शेयर अवघ्या 6 महिन्यात 53 रुपयांवरून 857.70 रुपयांवर पोहचला आहे. याचा अर्थ आहे की या दरम्यान कंपनीच्या शेयरमध्ये 1518 टक्के तेजी पहायला मिळाली. एक वर्षात या फर्मने गुंतवणुकदारांना 1354 टक्के रिटर्न दिला आहे. अशाप्रकारे हा स्टॉक एका वर्षातच मल्टीबॅगरच्या (Multibagger Stock) यादीत गेला आहे.

6 महिन्यात 10 हजार झाले 1.62 लाख
या शेयरने छोट्या गुंतवणुकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. 6 महिन्यांपूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने या शेयरमध्ये अवघे 10 हजार रुपयांची गुंतवणुक केली असती तर आज त्याची व्हॅल्यू 1.62 लाख रुपये झाली असती. तर 50 हजार रुपयांची गुंतवणुक करणार्‍यांचे पैसे 8 लाखांपेक्षा जास्त (Multibagger Stock) झाले असते.

तर दुसरीकडे गुंतवणुकदारांनी 6 महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज 16 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली असती. एखाद्या मोठ्या गुंतवणुकदाराने 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची व्हॅल्यू 1.61 कोटी रुपये झाली असती.

विक्रमी स्तरावर पोहचला शेयर बाजार
आज शेयर बाजार (stock market) विक्रमी स्तरावर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सने 62 हजारची पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे निफ्टीने 18600 ची पातळी ओलांडली आहे.
दोन्ही आपल्या पीकवर पुन्हा पोहचले आहेत.

सेन्सेक्स 328 अंकाच्या तेजीसह 62106 अकांवर व्यवहार करत आहे.
तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 50 93 अंकाच्या तेजीसह 18570 अंकावर व्यवहार करत आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | kwality pharmaceuticals ltd share over 1500 percent return in 6 months news in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakesh Jhunjhunwala | कमाईची सुर्वणसंधी ! SEBI ने 6 कंपन्यांच्या IPO ला दिली मंजूरी, जमवणार 12 हजार कोटी रुपये

Multibagger Stock | 320 रुपयांचा शेयर झाला 6200 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 1600% चा रिटर्न; जाणून घ्या पुढे सुद्धा राहणार का तेजी?

Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान (व्हिडीओ)