Multibagger Stock | 25 रुपयांवरून 11000 च्या पुढे पोहचला हा शेअर, 1 लाखाचे झाले 4.5 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | एका केमिकल कंपनीच्या शेअर्सने घसघशीत रिटर्न दिला आहे. मल्टीबॅगर रिटर्न देणारी ही कंपनी भारत रसायन (Bharat Rasayan) आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 25 रुपयांवरून 11,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअरनी गुंतवणूकदारांना 35,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 15,100 रुपये आहे. त्याच वेळी, भारत रसायनचा 52 आठवड्यांचा निचांक स्तर 9,482.75 रुपये आहे.

 

1 लाखाचे झाले 4.5 कोटींहून पेक्षा जास्त
30 जुलै 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज Bombay Stock Exchange (BSE) वर रासायनिक कंपनी भारत रसायनचा शेअर 24.10 रुपयांच्या पातळीवर होता. 24 मे 2022 रोजी कंपनीचा शेअर 11,011 रुपयांवर बंद झाला आहे.

 

या कालावधीत कंपनीच्या शेअरनी गुंतवणूकदारांना 35,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 30 जुलै 2004 रोजी भारत रसायनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक ठेवली असती,
तर सध्या हे पैसे 4.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते. (Multibagger Stock)

25 मे 2012 रोजी भारत रसायनचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 140.50 रुपयांच्या पातळीवर होता.
काल 24 मे 2022 रोजी कंपनीचा शेअर 11,011 रुपयांवर बंद झाला आहे.

 

जर एखाद्या व्यक्तीने 25 मे 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 78.59 लाख रुपये झाले असते.
भारत रसायनच्या शेअरनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 314 टक्के रिटर्न दिला आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger bharat rasayan turned 1 lakh rupee into more than 4 crore

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा