Multibagger Stock | एका वर्षातच 1 लाखाचे झाले 25 लाख रुपये, ‘हा’ मल्टीबॅगर स्टॉक 36 रुपयांवरून पोहचला 940 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | गेल्या वर्षभरात शेअर बाजारात (Stock Market) मोठी उलथा-पालथ झाली आहे. असे असूनही, असे अनेक शेयर आहेत ज्यांनी भारतीय बाजारपेठेत त्यांच्या गुंतवणूकदारांना भरपूर पैसे कमावून दिले आहेत (earn money from multibagger stock). यापैकी काही स्टॉक असे आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर पैसे कमावून दिले आहेत. यापैकीच एक शेअर एक्सप्रो इंडियाचा आहे. (Multibagger Stock)

 

Xpro India ने एका वर्षात भागधारकांना सुमारे 2,500 टक्के परतावा दिला आहे. हा शेअर 4 जानेवारी 2021 रोजी 36.20 रुपये होता, जो 4 जानेवारी 2022 ला वाढून 940 रुपये झाला. या मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) ने गेल्या 12 महिन्यांत 2,469 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्स 23.61 टक्क्यांनी वधारला आहे.

 

1 लाख झाले सुमारे 26 लाख

गेल्या वर्षी 4 जानेवारी रोजी एक्सप्रो इंडियाच्या स्टॉकमध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम आज 25.96 लाख रुपये झाली असती.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर स्मॉल कॅप स्टॉक 4.94 टक्क्यांनी घसरून 891 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. (Multibagger Stock)

 

एक्सप्रो इंडिया स्टॉक 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा जास्त, पण 5 दिवस आणि 20 दिवसांच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा कमी आहे. स्टॉकने 8 डिसेंबर 2021 रोजी रु. 1,015 या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता आणि 1 जानेवारी 2021 रोजी रु. 34.50 असा 52 आठवड्याचा नीचांक होता.

 

जाणून घ्या फर्मचा निव्वळ नफा

फर्मने मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात 1,987 टक्के वाढ नोंदवली. मार्च 2020 आर्थिक वर्षात 0.40 कोटी नफ्याच्या तुलनेत मागील आर्थिक वर्षात निव्वळ नफा वाढून 8.35 कोटी रुपये झाला.

 

याशिवाय, मार्च 2020 आर्थिक वर्षात 354.84 कोटी रुपयांच्या तुलनेत मागील आर्थिक वर्षात विक्री 5.22 टक्क्यांनी वाढून 373.35 कोटी रुपये झाली आहे.
सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 105.69 टक्क्यांनी वाढून रु. 10.84 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 5.27 कोटी होता.

 

एक्सप्रो इंडिया ही बिर्ला समूहाची फर्म आहे, जी रेफ्रिजरेटर्ससाठी कॅपेसिटर आणि लाइनर्ससाठी पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करते.
सध्या, कॅपेसिटरसाठी पॅकेजिंग साहित्य तयार करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :-  Multibagger Stock multibagger stock 2021 rs 36 to rs 940 this stock delivered 2500 per cent returns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा