Multibagger Stock | 35 पैशाच्या पेनी स्टाॅकने केलं मालामाल ! 6 महिन्यात 1 लाखांचे 17 कोटी; तुमच्याकडे आहे ‘हा’ शेअर?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Multibagger Stock | आपल्या गुंतवणूकीतून अधिक कमाई करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांच्या (Investors) नजरा चांगल्या आणि कमाई करणाऱ्या शेअरकडे असते. अशातच एका मल्टीबॅगर शेअरबाबत (Multibagger Stock ) सांगत आहोत, ज्या शेअरने अवघ्या 6 महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. म्हणजेच त्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे. अशा स्टॉककडून सहा महिन्यामध्ये एक लाख 75 हजार टक्क्यांहून जादा रिटर्न्स (Returns) देण्यात आले आहेत.

 

जादा रिटर्न्स देण्यात आलेल्या अशा स्टॉकचं नाव ”सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड” (Sel Manufacturing Company Ltd) आहे.
काल (गुरूवारी) या कंपनीचा शेअर NSE वर 4.99 टक्क्यांनी वाढून 643.55 रुपयांवर बंद झाला होता.
दरम्यान, तो या वर्षातील संभाव्य मल्टी बॅगर स्टॉकच्या (Multibagger Stock) लिस्टमध्ये आहे. दरम्यान, हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 ला NSE वर 35 पैशांच्या पातळीवर बंद झाला होता. 6 महिन्यांनंतर आता या शेअरचा दर 643.55 रुपयांवर गेला आहे. या काळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एक लाख 75 हजार टक्क्यांहून जास्तच परतावा दिला आहे.

 

दरम्यान, यंदा वर्ष 2022 मध्ये हा स्टॉक 44.40 (3 जानेवारी 2022) वरून 643.55 रुपयांपर्यंत वाढला गेला आहे.
या कालावधीमध्ये या शेअरनं 1280 टक्क्यांपेक्षा जादा रिटर्न्स दिले आहे. त्याचबरोबर या शेअरने एका महिन्यामध्ये 129 टक्क्यांपेक्षा जादा परतावा दिला.
24 फेब्रुवारी 2022 ला शेअरचा दर 267.65 रुपये होता. तर, मागील 5 ट्रेडिंग सत्रांत या स्टॉकचा दर 22 टक्क्यांनी वाढला.

या दरम्यान. टेक्सटाईल कंपनी सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (Sel Manufacturing Company Ltd) च्या शेअर प्राईजच्या हिस्ट्रीनुसार,
जर कोणत्याही गुंतवणूकदारानं 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचं मूल्य आज 17.151 कोटी रुपये एवढा झालाय.
त्याचबरोबर जेव्हा एखाद्या व्यक्तीने यंदा स्टाॅकमध्ये 44.40 रुपये मूल्यावर एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचं मूल्य आज 2.29 लाख रुपये असते.
म्हणजेच काही कालावधीमध्ये ही रक्कम डबल झाली असती.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock crorepati penny stock sel manufacturing share delivered 175028 percent return in 6 month huge returns bse nse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Pune | पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

 

Esha Gupta Monokini Photo | ईशा गुप्तानं असे कपडे घालून काढले मादक फोटो, फोटोतील बोल्डनेस पाहून चाहत्यांची खिळली नजर..

 

Maharashtra Weather Update | दक्षिण कोकणात कोसळणार पावसाच्या सरी; ‘या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या पुण्यात काय स्थिती ?