Multibagger Stock | ‘या’ शेअरने एका वर्षात दिला 600% रिटर्न, आता ‘स्टॉक स्प्लिट’ करणार कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | दर्शन ओरना (Darshan Orna) लि. ने सोमवारी स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, त्यांचे संचालक मंडळ कंपनीच्या शेअरच्या विभाजनावर चर्चा करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी 6 एप्रिल रोजी बैठक घेईल. (Multibagger Stock)

 

कंपनीने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, आम्ही सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, 2015 चा नियम 29 च्या अनुषंगाने सूचित करतो की,
शेअर स्प्लिट आणि यावर विचार आणि मंजूरी देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार, 6 एप्रिल, 2022 रोजी होईल.

 

एका वर्षात 600% रिटर्न
सोमवारी दर्शन ओरना (Darshan Orna) चा शेअर बीएसईवर सुमारे 5 टक्क्यांनी घसरून 88.05 रुपयांवर बंद झाला.
विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात त्याने गुंतवणूकदारांना सुमारे 600 टक्क्यांचा मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.
त्याच वेळी, कंपनीचा स्टॉक 2022 मध्ये सुमारे 14 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. (Multibagger Stock)

2011 मध्ये स्थापन झालेल्या दर्शन ओरना या कंपनीचे 2015 मध्ये सार्वजनिक कंपनीत रूपांतर करण्यात आले.
हा सोन्या – चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायात गुंतलेला आहे एक लघु आणि मध्यम उद्योग (SME) आहे.

कंपनीने उत्तर गुजरातमधील अहमदाबादमधील माणिक चौक परिसरात एक युनिट स्थापन करून सोन्या – चांदीच्या दागिन्यांचे घाऊक विक्रेते आणि ट्रेडर म्हणून व्यवसाय सुरू केला होता.

स्टॉक स्प्लिटचा अर्थ
स्टॉक स्प्लिट (Stock Split) किंवा शेअर विभाजनात कंपनीच्या शेअर्सची संख्या वाढते. उदाहरणार्थ 1 चे 2 मध्ये विभाजन केल्यास प्रत्येक गुंतवणूकदाराला एका शेअरसाठी 2 शेअर्स मिळतील आणि प्रत्येक शेअरचे मूल्य अर्धे केले जाईल. स्टॉक स्प्लिटमुळे प्रत्येक शेअरची बाजार मूल्य कमी होते, परंतु कंपनीचे एकूण बाजार भांडवल बदलत नाही.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock darshan orna rises nearly 600 per cent in one year now board going to consider stock split

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा