Multibagger Stock | ‘हा’ कमालीचा शेअर ! 12 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुमच्याकडे आहे काय?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock) बाजारात धुमाकूळ घालत आहेत. या स्टॉक्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दोन वर्षे नव्हे तर काही दिवसांतच दुप्पट केले आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका शेअरबद्दल सांगत आहोत, ज्याने केवळ 12 ट्रेडिंग सत्रात बंपर परतावा (Stock Return) देऊन गुंतवणूकदारांना गर्भश्रीमंत बनवलंय. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

 

आपण KIFS वित्तीय सेवा स्टॉकबद्दल Multibagger Stock बोलत आहोत. 31 डिसेंबर 2021 रोजी, हा BSE सूचीबद्ध स्टॉक 43.50 स्तरावर बंद झाला. पण, नवीन वर्षाच्या आगमनाने शेअरमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात, तो सगळ्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 5 टक्क्यांहून अधिक वरच्या सर्किटला पोहोचला आहे.

जाणून घ्या 12 दिवसात किती परतावा दिला.
KIFS Financial Services हा X श्रेणीचा असाच एक स्टॉक आहे ज्याने केवळ 12 सत्रात शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. स्टॉक 5 जानेवारी 2022 रोजी शेअर बीएसईवर 64.80 रुपये स्तरावर बंद झाला, तर 21 जानेवारी रोजी तो 133.40 रुपये प्रति शेअरवर बंद झाला, म्हणजे केवळ 12 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरधारकांचे पैसे दुप्पट झाले.

 

हा शेअर गेल्या एका महिन्यात 39.95 रुपयांवरून 140.05 रुपयांपर्यंत वाढला
जर आपण रिटर्नच्या दृष्टिकोनातून शेअरच्या किमतीची हिस्ट्री पाहिली तर, NBFC चा स्टॉक गेल्या एका आठवड्यात 115.25 रुपयांवरून 140.05 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याचा शेअरधारकांना 21.50 टक्के नफा झाला आहे.
गेल्या एका महिन्यात तो 39.95 रुपयांवरून 140.05 रुपयांपर्यंत वाढला आहे.
या कालावधीत सुमारे 250 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

Web Title :-  Multibagger Stock | multibagger stock kifs financial services doubles shareholders money in 12 sessions

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा