Homeआर्थिकMultibagger Stock | 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; एका महिन्यात दुप्पट पैसे,...

Multibagger Stock | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; एका महिन्यात दुप्पट पैसे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Stock | अलीकडे गुंतवणूकदार (Investors) अनेक फायदेशीर शेअरकडे वळताना दिसत आहेत. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यासाठी गुंतवणूकदार शेअर्स शोधत आहेत. दरम्यान, मल्टी बॅगर रिटर्न्स (Multibagger Stock) देणाऱ्या कोहिनूर फूड्सच्या स्टॉकलाही (Kohinoor Foods) काल (मंगळवारी) अप्पर सर्किट लागला आणि हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर गेला. अदानी विल्मरने (Adani Wilmer) 3 मे रोजी कोहिनूर ब्रँड विकत घेतल्यापासून कोहिनूर फूड्सचे शेअर्स वारंवार वाढत आहेत. पण, मागील काही दिवसांपासून त्यात घट झालीय.

 

अदानी विल्मर लिमिटेडने (Adani Wilmer Ltd.) 3 मे रोजी McCormick स्वित्झर्लंड GmbH कडून पौराणिक कोहिनूर ब्रँडसह अनेक ब्रँड्स खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या संपादनामुळे अदानी विल्मरला भारतातील कोहिनूर बासमती तांदळाचा ब्रँड कोहिनूर ब्रँड अंतर्गत रेडी – टू – कुक, रेडी – टू- इट, करी आणि फूड पोर्टफोलिओ मिळतो आहे. त्याचबरोबर मल्टीबॅगर परतावा कोहिनूर फूड्सचा स्टॉक हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. मागील एका महिन्यात या शेअरने 132 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला. 11 एप्रिल 2022 रोजी कोहिनूर फूड्सच्या शेअरचा भाव 8.90 रुपये होता, काल 20.65 रुपयांवर गेला. (Multibagger Stock)

दरम्यान, मागील बावीस दिवसांमध्ये या शेअरच्या दरात 102 टक्क्यांनी वाढ झालीय. कोहिनूर फूड्सचा स्टॉक मागील 5 ट्रेडिंग सत्रांत 20.76 टक्क्यांनी वाढला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक 232,002 रुपये झाली आहे. कोहिनूर फूड्स ही खाद्यपदार्थांच्या निर्मिती आणि डिस्ट्रिब्युशन मधील एक आघाडीची कंपनी आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock kohinoor foods doubled investors money in one month

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News