Multibagger Stock | 94 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना दिला 21.7 लाखांचा रिटर्न, तुम्ही खरेदी केला आहे का हा स्टॉक?

नवी दिल्ली : Multibagger Stock | शेयर बाजारातील (Stock Market) गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी आहे. तुम्ही सुद्धा वर्षभरापूर्वी केपीआयटी टेक्नॉलॉजीस लिमिटेड (KPIT Technologies Limited) च्या शेयरमध्ये पैसे लावले असते तर आता तुम्हाला मोठा रिटर्न मिळाला असता. (Multibagger Stock)

होय, केपीआयटी टेक्नॉलॉजीस स्टॉक (KPIT Technologies stock) ने मागील एक वर्षात आपल्या शेयरधारकांना 300 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये बुधवारी मोठ्या व्हॉल्यूदरम्यान स्टॉक 10 टक्के वाढून 410.45 रुपयांसह आपल्या ऑल टाइम हायवर पोहचला.

मागील सात दिवसांपासून यामध्ये तेजी येत आहे. याच कालावधीदरम्यान यामध्ये 30 टक्के तेजी आली आहे. मागील एक वर्षात शेयरची किंमत 94.5 रुपयांनी वाढून 410.45 रुपये झाली. (Multibagger Stock)

गुंतवणुकदारांना मिळाला जबरदस्त रिटर्न

एक वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Multibagger Stock) गुंतवलेली 5 लाख रुपयांची रक्कम आज 21.7 लाख रुपये झाली असती. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेयरने सुमारे 182 टक्के उसळी घेतली आहे.

Pune News | इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक विद्याधर वैद्य यांचे पुण्यात निधन

11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या बाजार भांडवलासह, शेयर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि
200 दिवसाच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा जास्त आहे.

KPIT Tech ने सप्टेंबर 2021 ला समाप्त झालेल्या तिमाहीसाठी 65 कोटी रुपयांचा लाभ नोंदवला आहे,
तर एक वर्ष अगोदरच्या तिमाहीत 27.8 कोटी रुपयांचा निव्वळ लाभ झाला होता.
तिमाहीच्या दरम्यान कंपनीचा निव्वळ महसूल 22 टक्के वाढून 590.87 कोटी रुपये झाला.

टार्गेट प्राईस पार केली

ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, FY23 EBITDA मार्जिन (17.8 टक्के) FY20 च्या 13.7 टक्के, FY21 च्या 15.2 टक्के आणि FY22 च्या 17.5 टक्केच्या पुढे गेले आहे.
हा शेयर अगोदरच 400 रुपये प्रति शेयरच्या लक्ष्य मूल्याच्या पुढे गेला आहे.

स्टॉक आपल्या सरासरी ऐतिहासिक मूल्यांकनाच्या तुलनेत सूटवर सुद्धा व्यवहार करत आहे आणि 17.1 च्या
रिटर्न ऑन इक्विटीसह (ROE), त्याचे ‘फेयर’ व्हॅल्यूएशन आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Multibagger Stock | multibagger stock kpit technologies surge 94 rupees to rs 410 investors get 21 lakh rupee check how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update