Multibagger Stock | तीन महिन्यात ‘हा’ शेयर रू. 5 वरून 129 रुपयांवर पोहचला, गुंतवणुकदारांच्या 50 हजाराचे केले 10.93 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | कोरोना महामारीच्या काळात अनेक शेयर्सचा मल्टीबॅगर्सच्या यादीत समावेश झाला आहे. जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्सच्या (Multibagger Stock) शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने केवळ 3 महिन्यांत गुंतवणूकदारांना मालामाल केले. या स्टॉकचे नाव एसईएल मॅन्युफॅक्चरिंग (SEL Manufacturing) आहे. या शेयरने अवघ्या 3 महिन्यांत आपल्या शेयरधारकांना 2,086 हून जास्त मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger stock return) दिला आहे.

 

3 महिन्यांत गुंतवणूकदार झाले लखपती
गेल्या तीन महिन्यांत SEL Manufacturing च्या शेअरच्या किमतीत (stock price) प्रचंड वाढ झाली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत प्रति शेअर 5.90 रुपये होती. त्याच वेळी, 3 फेब्रुवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 129 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. म्हणजेच या अल्पावधीत या शेयरने 2086.44 टक्के रिटर्न दिला आहे. 3 फेब्रुवारीला NSE वर शेअर 4.96 टक्क्यांनी वाढला होता. (Multibagger Stock)

 

1 वर्षात 6,192% रिटर्न
जर मागील 1 वर्षाच्या शेअर प्राईस पॅटर्न पाहिला तर SEL Manufacturing च्या शेअर्सनी आश्चर्यकारक रिटर्न दिला आहे.
या शेयरने एका वर्षात 6,192.68 टक्के रिटर्न दिला आहे. 4 फेब्रुवारी 2021 रोजी या शेअरची किंमत NSE वर फक्त 2.05 रुपये होती आणि आता हा शेअर वाढून 129 रुपये झाला आहे.

 

त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात हा स्टॉक रु 44.40 (3 जानेवारी रोजी बंद किंमत) वरून 129 पर्यंत वाढला.
या कालावधीत या शेयरने आपल्या शेयरधारकांना 190.54 टक्के रिटर्न दिला आहे.

रकमेनुसार जाणून घ्या किती झाला नफा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तीन महिन्यांपूर्वी 50,000 रुपये गुंतवले असते, तर त्याचे 50 हजार आज 10.93 लाख रुपये झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 महिन्यांपूर्वी 50,000 रुपये गुंतवले असते, तर त्याचे 50 हजार आज 1.45 लाख झाले असते.

या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी गुंतवलेली 50 हजारांची रक्कम आज 31.46 लाख रुपये झाली असती.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock sel manufacturing given 2k percent return in 3 month 50k turn to 10 lakh rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Best Multibagger Stocks | वर्षभरात ‘या’ स्टॉकने दिला 115% रिटर्न, ब्रोकरेज फर्मने म्हटले – लवकर खरेदी करा

 

Post Office Scheme | 400 रुपये जमा करून 1 कोटीचे मालक बनायचे असेल तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

 

Mouni Roy Bold Photo | मौनी रॉयनं ब्रालेटमध्ये दिल्या मिलियन डॉलरच्या पोज, फोटो झाले व्हायरल