Multibagger Stock | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअरने दिला जबरदस्त रिटर्न, 1 लाखाचे झाले थेट 1.5 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. गेल्या अनेक सत्रांत शेअर बाजाराने घसरण नोंदवली आहे. पण यादरम्यान, असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना निराश केलेले नाही. म्हणूनच असे म्हणतात की शेअर बाजारात पैसे गुंतवल्यानंतर पेशन्स असणे आवश्यक आहे. तुमच्यात संयम असेल तर तुम्हाला हजारो रुपयांचे लाखात रुपांतर करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. (Multibagger Stock)

 

टाटा समूहाच्या मल्टीबॅगर शेअरचा प्रवास
2021 आणि 2022 मध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी बंपर रिटर्न देऊन आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असे अनेक शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांनी काही पैशांमध्ये खरेदी केले होते आणि आता ते शेकडोचे झाले आहेत. अशा अनेक स्टॉक्सबद्दल आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. आज पुन्हा टाटा समूहाच्या (Tata Group) अशाच आणखी एका शेअरचा प्रवास जाणून घेवूयात…

 

8,495 च्या पातळीवर पोहोचला शेअर
टाटा समूहाची कंपनी टाटा अलेक्सी (Tata Elxsi) च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे आज करोडपती झाले आहेत. 8 मे 2009 रोजी बीएसई (BSE) वर टाटा अलेक्सीच्या शेअरची किंमत 59.20 रुपये होती. 23 मे 2022 रोजी जारी झालेल्या ट्रेडिंग सत्रात, हा स्टॉक सुमारे 1 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो 8,494.70 रुपयांवर राहिला आहे. (Multibagger Stock)

52 आठवड्यांचा निचांक 3,532 रुपये
टाटा अलेक्सी (Tata Elxsi) स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 3,532 आहे. त्याच वेळी, त्याचा उच्चांक 9,420 रुपये आहे. टाटा समूहाच्या (Tata Group) या शेअरने गेल्या 13 वर्षांत सुमारे 14,300 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2009 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज ते 1.43 कोटींहून जास्त झाले असते.

 

59.20 रुपये ते 8,495 रुपयांपर्यंतचा प्रवास
8 मे 2009 रोजी टाटाच्या या शेअरची किंमत BSE वर 59.20 रुपये होती.
23 मे रोजी तो 8495 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या पाच वर्षांत हा शेअर 681.25 रुपयांवरून 8,495 रुपयांपर्यंत वाढला आहे.
त्याच वेळी, गेल्या एका वर्षात हा शेअर 3582 रुपयांवरून 8,495 रुपयांपर्यंत वाढला.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock share market tata group tata elxsi share gave bumper return in 13 years

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा