Multibagger Stock | Tata Group च्या ‘या’ शेअरचा प्रचंड फायदा; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Stock | अनेक गुंतवणूकदार (Investors) आपल्याला चांगला परतावा मिळण्यासाठी चांगल्या शेअर्सकडे पाहतात. त्याचबरोबर अनेक स्टाॅक असेही आहेत की अनेक गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. रशिया – युक्रेन (Russia – Ukraine) युद्धा दरम्यान बाजारात गुंतवणूकदारांनी विक्री सुरुच ठेवली होती. दरम्यान तरीही काही स्टाॅकने गुंवणूकदारांना चांगला परतावा (Multibagger Stock) मिळवून दिला आहे. तर, आयटी सेवा कंपनी TCS च्या शेअर्समध्येही (TCS Stock) जबरदस्त वाढ झालीय. या शेअरमध्ये आज देखील वाढ दिसून येतेय. ब्रोकरेज हाऊसेसने देखील टीसीएसच्या स्टॉकला पसंती दिलीय. (Tata Group)

 

TCS ने कंपनीच्या (TCS Stock) प्रति इक्विटी शेअरमध्ये 22 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केलीय.
दरम्यान, ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांनी या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत, 4240 रुपयांची लक्ष्य किंमत दिलीय. सध्याचा दर 3696 रुपये आहे.
अर्थात सध्याच्या दरावरुन शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळणार आहे. (Multibagger Stock)

 

तर, 4Q FY22 मध्ये कंपनीचा महसूल 6700 दशलक्ष डॉलर इतका होता.
जो तिमाही आधारावर 3.2 टक्क्यांनी वाढलाय. कंपनीचा निव्वळ नफाही अपेक्षेप्रमाणे जवळपास 9926 कोटी रुपये इतका आहे.

दरम्यान, टीसीएस कंपनीचा (TCS Company) नफा वाढताना दिसत आहे.
तसेच, बाजारातील घसरणीच्या वातावरणात देखील ती 7.5 टक्के वार्षिक वाढ नोंदविण्यात आलीय.
या दरम्यान, या शेअरवर ब्रोकरेज हाऊसेसने संमिश्र प्रतिक्रिया दिली.
याचा अर्थ काही ब्रोकरेज हाऊसने या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिलाय तसेच काहींनी होल्ड करण्याचा देखील सल्ला दिलाय.
मात्र, आयटी क्षेत्रातील मागणी आणि ही कंपनी मार्केट लीडर असल्याने निश्चितच फायदा होईल. असेही सांगण्यात आलं आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :-  Multibagger Stock | multibagger stock tcs q4 pat rises 9926 cr recommends final dividend of rs 22 per share

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा