Multibagger Stock | ‘या’ शेयरने दिला 6000 टक्के रिटर्न ! गुंतवणुकदारांना बनवले लखपती, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का हा Stock?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) जागतिक शेअर बाजारात उलथा-पालथ माजवली आहे. त्यामुळे वस्तूंच्या विशेषत: कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 2008 च्या आर्थिक संकटानंतर क्रूडच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने रासायनिक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. या उद्योगात अनेक उत्पादने बनवण्यासाठी कच्चे तेल किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह वापरले जाते. (Multibagger Stock)

 

असे असूनही, रासायनिक क्षेत्रातील अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न दिला आहे. अल्काईल अमाईन्स, दीपक नायट्रेट, प्रिव्ही स्पेशॅलिटी केमिकल्स, थिरुमलाई केमिकल्स, आरती इंडस्ट्रीज, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल आणि बालाजी अमाईन्स यांनी गेल्या 10 वर्षांत 1000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.

 

Alkyl Amines ने दिला 6,000 टक्के रिटर्न
स्थानिक केमिकल मेन्युफॅक्चर Alkyl Amines Chemicals हा असा एक स्टॉक आहे, ज्याने गेल्या आठ वर्षांत सुमारे 6,000 टक्के रिटर्न दिला आहे. या कालावधीत बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) ची वाढ 160 टक्के होती. अल्काइल अमाइन केमिकल्स लि. स्टॉकमध्ये गेल्या आठ वर्षांत 5,950 टक्क्यांची तेजी होती.

 

कंपनीचा शेअर 16 मार्च 2014 रोजी 49 रुपये होता, जो 16 मार्च 2022 रोजी वाढून 2,963 रुपये झाला. जर तुम्ही मार्च 2014 मध्ये या कंपनीत 10000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती रक्कम आज सुमारे 6 लाख रुपये झाली असती. (Multibagger Stock)

क्रूडमध्ये वेगाने सुधारणा
क्रूडच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे केमिकल स्टॉक्सच्या आऊटलूकमधील सुधारणेमुळे हा स्टॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर या शेअरने जवळपास 37 टक्के रिटर्न दिला आहे. मात्र, महिनाभरात सुमारे 3 टक्क्यांनी घट झाली आहे.

 

जाणून घ्या काय करते कंपनी
कंपनी गेल्या 30 वर्षांपासून अ‍ॅलिफॅटिक अमाइन्स, एमाइन डेरिव्हेटिव्हज आणि
इतर विशेष रसायनांची निर्मिती आणि विपणनाच्या व्यवसायात गुंतलेली आहे.
कंपनी फार्मास्युटिकल, अ‍ॅग्रोकेमिकल, रबर केमिकल आणि
वॉटर ट्रीटमेंट इंडस्ट्रीज इत्यादींना अमाईन आणि अमाइन बेस्ड केमिकल पुरवठादार आहे.

 

कंपनीकडे 12 प्रॉडक्शन प्लांटसह तीन प्रॉडक्शन साईट आहेत,
ज्या महाराष्ट्रातील पाताळगंगा आणि कुरकुंभ आणि गुजरातमधील दहेज येथे आहेत.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock this chemical stock turned rs 10000 into rs 6 lakh in 8 years again back in town

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | MIM च्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

 

Multibagger Stock | 10 पैशांच्या जबरदस्त स्टॉकने गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले 57 कोटी रुपये, दिला 5 लाख टक्के भरभरून रिटर्न

 

Sanjay Raut | ‘द कश्मीर फाइल्स’मधील अनेक घटना खोट्या, संजय राऊतांचे मोठं विधान