Multibagger Stock | अदानी समूहाच्या या शेअरने रू. 1 लाखाचे बनवले रू. 61 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | अदानी समूहाच्या शेअर्सच्या (Adani Group’s shares) गुंतवणूकदारांवर सध्या धनवर्षाव होत आहे. कंपनीचे जवळपास सर्व शेअर्स गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न देत आहेत. हे तेव्हा घडत आहे, जेव्हा संपूर्ण बाजार उलट्या दिशेने वाटचाल करत आहे. आज आपण अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) बद्दल बोलत आहोत. (Multibagger Stock)

 

या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 6,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. 3 वर्षांपूर्वी हा शेअर 37.40 रुपयांवर होता, जो आज 2279 रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, या शेअरवरही गेल्या काही दिवसांपासून विक्रीचा दबाव आहे.

 

कंपनीची शेअर प्राईस हिस्ट्री
मनीकंट्रोलच्या मते, अदानी ग्रीन एनर्जी गेल्या एक महिन्यापासून कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहे. यादरम्यान, स्टॉकमध्ये मोठी घट झाली आहे. 1 महिन्यात हा स्टॉक 2800 रुपयांवरून 2279 रुपयांपर्यंत सुमारे 20 टक्क्यांनी घसरला आहे. (Multibagger Stock)

दुसरीकडे, जर आपण या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत बोललो तर या शेअरमध्ये 70 टक्के वाढ झाली आहे. हा 1347 रुपयांवरून 2279 रुपयांपर्यंत वाढला आहे.

या शेअरने गेल्या वर्षभरात 75 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, 3 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 61 पट रिटर्न दिला आहे. 17 मे 2019 रोजी हा स्टॉक रू. 37.40 वर बंद झाला आणि आता तो रू. 2279 वर आहे.

गुंतवणुकदारांना केले मालामाल
जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षाच्या सुरुवातीला या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 70 हजार रुपयांचा रिटर्न मिळाला असता.
वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज 75 हजार रुपयांचा रिटर्न मिळाला असता.

जर एखाद्याने 3 वषापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 61 लाख रुपये झाले असते.
अदानी ग्रीन शुक्रवारी 3,60,153 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह बंद झाला.

मात्र, जर एखाद्याने 1 महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर त्याला 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असते आणि त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 हजार रुपयांपर्यंत खाली आले असते.

त्याच वेळी, बर्‍याच काळापासून टॉप 10 मार्केट कॅप कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेली अदानी ग्रीन काही दिवसांपूर्वी या यादीतून बाहेर पडली.

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock this share of adani group made 1 lakh 61 lakh do you have this stock

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा