Multibagger Stock | याला म्हणतात मालामाल करणारा रिटर्न ! 23 वर्षात 1 लाखाचे बनवले 50 कोटी, पुढेही तेजीची शक्यता

नवी दिल्ली : Multibagger Stock | 75 देशांमध्ये व्यापार करणार्या एसआरएफ लिमिटेडच्या शेअर (SRF Limited Share) नी दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे (Multibagger Stock). 1999 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 2.06 रुपये होती, जी आता 2,604.90 रुपये झाली आहे. एसआरएफ लिमिटेडचा स्टॉक आता गुंतवणूकदारांना जास्त नफा देईल, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळेच ब्रोकरेज फर्म शेअरखानने त्याला बाय रेटिंग दिले आहे (Multibagger Share).
एसआरएफ लिमिटेड फ्लोरोकेमिकल्स, स्पेशालिटी केमिकल्स, पॅकेजिंग फिल्म्स, टेक्निकल टेक्सटाइल्स, कोटेड फॅब्रिक्स आणि लॅमिनेटेड फॅब्रिक्स तयार करते.
ही एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि तिचे बाजार भांडवल रु. 77,159.38 आहे. गेल्या 23 वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. (Multibagger Stock)
23 वर्षात दिला मल्टीबॅगर रिटर्न
लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, एसआरएफ लिमिटेडचा स्टॉक शुक्रवारी 2.30 टक्क्यांनी घसरून 2,604.90 रुपयांवर
बंद झाला. हा मल्टीबॅगर स्टॉक 1 जानेवारी 1999 रोजी रु. 2.06 वर ट्रेडिंग करत होता.
तेव्हापासून हा शेअर 126,351.46 टक्क्यांनी वाढला आहे.
1999 मध्ये जर कोणी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला त्यावेळी 48,543 शेअर्स मिळाले असते. कंपनीने 13 ऑक्टोबर 2021 रोजी बोनस शेअर्सही दिले.
कंपनीने 4:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. बोनस शेअरनंतर 1999 मध्ये 1 लाख रुपये गुंतवणार्या गुंतवणूकदाराकडे 1,94,172 झाले. आज एसआरएफ शेअर्सच्या किमतीवर नजर टाकली तर 1,94,172 शेअर्सची किंमत आता 50.67 कोटी रुपये झाली आहे.
पहिल्या तिमाहीत चांगली वाढ
आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत एकत्रित आधारावर एसआरएफ लिमिटेडचा ग्रोस ऑपरेटिंग रेव्हेन्यू रु. 3,894.7 कोटी होता, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 44.3 टक्क्यांनी वाढला आहे.
त्याचप्रमाणे, कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 51.8 टक्क्यांनी वाढून 678.2 कोटी रुपये झाला आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीचा करानंतरचा नफा देखील वार्षिक आधारावर 53.8 टक्क्यांनी वाढून 608 कोटी रुपये झाला आहे.
गुंतवणूक करावी का?
ब्रोकरेज फर्म शेअरखानचे म्हणणे आहे की एसआरएफ लिमिटेडचा स्टॉक यापुढेही गुंतवणूकदारांना चांगला नफा देऊ शकतो. कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष केमिकल सेगमेंटवर असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
पुढील 5 वर्षांत या विभागात 12,500 कोटी रुपये खर्च करण्याचा कंपनीचा मानस आहे.
केमिकल बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याचा कंपनीला फायदा होईल, असे शेअरखानचे म्हणणे आहे.
एसआरएफ शेअरला बाय रेटिंग देत, शेअरखानने त्याची टार्गेट प्राईस 2,960 रुपये दिली आहे.
Web Title :- Multibagger Stock | multibagger stock turns rs 1 lakh to rs 50 crore by giving only 1 bonus issue
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन
Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला