Multibagger Stock | 20 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार बनले लखपती, एका वर्षात 1 लाख झाले 31 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | शेयर बाजार (Share Market) मधून गुंतवणुकदारांना हाय रिटर्न मिळत आहे. बाजार 61,000 चा आकडा पार करून पुढे गेला आहे. यामुळे अनेक छोटे-मोठे स्टॉक मल्टीबॅगर (Multibagger Stock) ठरत आहेत. यापैकी एक एक्सप्रो इंडिया (Xpro India) चा शेयर आहे. हा शेयर अलिकडेच दिग्गज गुंतवणुकदार आशीष कचोलिया (Ashish Kacholia) यांनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये सहभागी केला होता.

तब्बल 31 पट झाली वाढ

या स्टॉकने (Multibagger Stock) मागील एक वर्षात आपल्या शेयरधारकांना शानदार रिटर्न देऊन आश्चर्यचकीत केले आहे.
मागील एका वर्षात एक्सप्रो इंडियाच्या शेयरची किंमत (Xpro india share price) 20.95 वरून वाढून 652 झाली आहे. या दरम्यान या शेयरमध्ये 31 पट वाढ झाली आहे.

 

Xpro India च्या शेयरची किंमत

आशीष कचोलिया पोर्टफोलियोमध्ये सहभागी या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेयर मुल्यावर नजर टाकली तर हा शेयर मागील एक महिन्यात 401.50 वरून वाढून 693 रूपये झाला.
या कालावधीत शेयरधारकांना सुमारे 70 टक्के रिटर्न मिळाला आहे. (Multibagger Stock)

दरवर्षी चांगली कामगिरी

मागील 6 महिन्यात आशीष कचोलियांचा हा पोर्टफोलियो स्टॉक 92.25 वरून वाढून 693 झाला आहे.
यावेळी त्याच्यात जवळपास 635 टक्केच्या वाढ नोंदली गेली आहे.
अशाप्रकारे, दरवर्षी या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे.

जवळपास 3,125 टक्के वाढ

2021 च्या या मल्टीबॅगर स्टॉकने 33.75 रूपयांवरून 693 च्या स्तराची वाढ केली आहे.
या वर्षी या शेयरमध्ये 1900 टक्के वाढ नोंदली गेली आहे.
अशाप्रकार, मागील एक वर्षात, आशीष कचोलिया यांचा हा स्टॉक 20.95 रूपयांवरून वाढून 652 प्रति शेयरवर पोहचला.
या कालावधीत या स्टॉकने जवळपास 3,125 टक्के वाढ नोंदवली आहे.

गुंतवणुकदार वर्षभरात झाले मालामाल

1 महिन्यात 1 लाख झाले 1.70 लाख

Xpro India च्या शेयर मूल्याचा इतिहासानुसार, जर एखाद्या गुंतवणुकदाराने आशीष कचोलिया यांच्या या पोर्टफोलियो स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 1.70 लाख रूपये झाले असते.

6 महिन्यात 1 लाख झाले 7.35 लाख

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यापूर्वी आशीष कचोलिया यांच्या या शेयरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती आणि आजपर्यंत या काऊंटरवमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 7.35 लाख झाले असते.

अशाप्रकारे, एखाद्या गुंतवणुकदाराने 2020 च्या अखेरीस या शेयरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 20 लाख झाले असते.

 

1 महिन्यात 1 लाख झाले 31 लाख

अशाप्रकारे, जर एखाद्या गुंतवणुकदाराने आशीष कचोलिया पोर्टफोलियो स्टॉकमध्ये एक वर्षापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती आणि या कालावधीत या मल्टीबॅगर स्टॉमध्ये (Multibagger Stock)
गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 31 लाख झाले असते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stock | multibagger stock xpro india share price 20 rupee to rs 652 one lakh become 31 lakh in a year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gulabrao Patil | ‘लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली’

Pune Crime | खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयाच्या निवृत्त प्राचार्यासह चौघांवर गुन्हा दाखल; अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली उकळले 17 लाख

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून कमावले 1600 कोटी रुपये, तुमच्याकडे आहेत का?