Multibagger Stock | ‘या’ 55 रुपयांच्या शेयरची कमाल, 1 लाखाचे झाले 69 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे धैर्य बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केली असेल, तर अशा स्थितीत, किंमत कमी-जास्त काळजी करू नये. कारण अनेकदा दिसून आले आहे की प्रतीक्षा केल्याने चांगला रिटर्न मिळाला आहे. (Multibagger Stock)

 

Navin Fluorine च्या शेअरच्या बाबतीत असेच दिसून आले आहे. कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या आठ वर्षांत NSE वर 55.26 रुपये (24 जानेवारी 2014) वरून 3803 रुपये प्रति शेअर झाली आहे. म्हणजेच या कालावधीत किमतीत सुमारे 6800 टक्क्यांची उसळी दिसून आली.

 

कंपनीच्या स्टॉकचा इतिहास
गेल्या काही सत्रांमध्ये हा शेअर फायदेशीर ठरलेला नाही. एका महिन्यात शेअरची किंमत 4245 रुपये प्रति शेअरवरून 3803 रुपये प्रति शेअर झाली. त्याच वेळी, आपण गेल्या 6 महिन्यांवर नजर टाकल्यास, शेअरची किंमत 3681.25 रुपयांवरून 3803 रुपये (25 जानेवारी 2022) पर्यंत वाढली आहे. (Multibagger Stock)

 

म्हणजेच, सुमारे 3% वाढ दिसून आली. एक वर्षापूर्वी जर एखाद्याने या कंपनीवर विश्वास ठेवला असता तर आज त्याचा रिटर्न 55% वाढला असता.

 

गेल्या 5 वर्षांचा विचार केला तर शेअरची किंमत 540 रुपयांवरून 3803 रुपये प्रति शेअर झाली आहे.
या कालावधीत सुमारे 600 टक्क्यांची उसळी दिसून आली. त्याच वेळी, 8 वर्षांपूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमत केवळ 55.26 रुपये होती.
म्हणजेच आठ वर्षांपूर्वी ज्याने गुंतवणूक केली असेल, तो आज मालामाल झाला असेल.

जर एखाद्याने महिनाभरापूर्वी Navin Fluorine च्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते 90 हजारांवर आले असते.
तर 6 महिन्यांपूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 1.03 लाख रुपये झाली असती.

 

त्याचवेळी वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज 1.55 लाख रुपये मिळाले असते.
तर आठ वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये आज 69 लाख रुपये झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | navin fluorine share price this 55 rupee share is amazing 1 lakh has become 69 lakh rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

 

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

 

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’