Multibagger Stock | टाटाच्या ‘या’ स्टाॅकने गुंतवणूकदार झाले मालामाल; 1 लाख झाले चक्क 2 कोटी, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Stock | गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांच्या नजरा अनेक फायदेशीर स्टाॅककडे लागल्या असतात. दरम्यान, अशा फायदेशीर स्टाॅकमधील एक म्हणजे टाटा समूह (Tata Group) आहे. गतवर्षी टाटा समूहाची (Tata Group Share) कंपनी मल्टीबॅगर शेअर्समध्ये (Multibagger Stock) होती. अलीकडेच शेअरने NSE वर 9420 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक (All Time High) गाठला होता. याच शेअरने गतवर्षी जवळपास 220 टक्के परतावा (Refund) दिला.

 

दरम्यान, टाटा एलेक्‍सी शेअरची प्राईज हिस्ट्री चेक केली तर दिसून येते की या सॉफ्टवेअर कंपनीचा शेअरधारकांना उत्कृष्ट परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. मागील तेरा वर्षांमध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक 42.48 रुपयांवरून 8,850 रुपये प्रति शेअर झाला. या काळात जवळपास 20 हजार 700 टक्के वाढ झाली. तर, 1 महिन्यात 35 टक्के परतावा आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 6 हजार 565 रुपयांवरून 8 हजार 850 रुपये पर्यंत वाढलाय, जो जवळपास 35 टक्क्यांनी वाढला. तर वार्षिक जवळपास 50 टक्क्यांनी वाढला. (Multibagger Stock)

 

दरम्यान, 2022 सालीही हा मल्टीबॅगर स्टॉक ठरु शकतो. गतवर्षी टाटा समूहाचा हा शेअर सुमारे 2 हजार 775 रुपयांवरून 8 हजार 850 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो या कालावधीत सुमारे 220 टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर मागील 5 वर्षांत हा स्टॉक शोस्टॉपर राहिलाय कारण या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअरधारकांना 1 हजार टक्क्यांहून जादा परतावा दिलाय. तसेच Tata Elxsi चे शेअर्स मागील दहा वर्षामध्ये जवळपास शंभर रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत सुमारे 8,850 पट वाढ झाली आहे. तसेच, मागील तेरा वर्षामध्ये टाटा समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 42.48 रुपयांवरुन (NSE 2 एप्रिल 2009 रोजी बंद किंमत) आज 8,850 रुपयांवर गेली आहे.

दरम्यान, एक लाख 2.08 कोटी रुपये झाले जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याआधी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते,
तर सध्या 1.35 लाख रुपये, एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी टाटा समूहाच्या या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर 1.53 लाख झाले असते.
तसेच, एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांआधी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर, 11 लाख रुपये झाले असते.
10 वर्षांआधी टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवल्यास आज ही 88.50 लाख रुपये झाले असते.
13 वर्षांपूर्वी असं केलं असतं तर 2.08 कोटी इतके झाले असते.

 

Web Title :- Multibagger Stock | one lakh rupees invested in tata elxsi share became 2 8 crores today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा