Multibagger Stock Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ रिटेल स्टॉकने केली कमाल ! 1 लाख रुपयांचे बनवले 1 कोटी, एक्सपर्ट आहेत ‘बुलिश’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock Tata Group | जर तुमच्यात संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये करोडपती देखील बनू शकता. बाजारात ’पर्चेस, होल्ड अँड फर्गेट’ असे धोरण आहे. या फॉर्म्युल्यातून गुंतवणूकदार दीर्घकाळात मोठा फायदा मिळवू शकतात. जर तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचा विचार करत असाल (Earn Money Form Share Market) तर आज आम्ही तुम्हाला अशा मजबूत स्टॉक (Multibagger Stock Return) बद्दल सांगत आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवून श्रीमंत झाले आहेत. आम्ही टाटा समूहा (Tata Group) ची रिटेल शाखा ट्रेंट (Trent) बाबत बोलत आहोत. ही नोएल टाटा (Noel Tata) यांच्या अध्यक्षतेखालील कंपनी आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया- (Multibagger Stock Tata Group)
10,713 टक्क्यांहून अधिक रिटर्न
या शेअरचा गेल्या 23 वर्षांचा कल पाहिला तर 1 जानेवारी 1999 रोजी NSE वर त्याची किंमत (Trent share price) 9.87 रुपये होती आणि 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत हा स्टॉक वाढून 1,067.30 रुपये प्रति शेअर झाला. या कालावधीत शेयरने सुमारे 10,713.58 टक्के वाढ नोंदवली आहे. दहा वर्षांपूर्वी, ट्रेंटचे शेअर्स 14 फेब्रुवारी 2012 रोजी NSE वरील 94.04 रुपयांच्या पातळीवरून 10 वर्षंपूर्वी 1,067.30 रुपयांच्या पातळीपर्यंत वाढले होते.
या काळात या समभागाने 1034.94 टक्के इतका जबरदस्त रिटर्न (Stock return) दिला आहे. त्याच वेळी, 5 वर्षांपूर्वी, या स्टॉकची किंमत सुमारे 246.10 रुपये (NSE वर 19 मे 2017) होती. या कालावधीत सुमारे 333.69 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या शेयरमध्ये वर्षभरात 1.20 टक्क्यांची वाढ झाली आहे. (Multibagger Stock Tata Group)
—
रक्कमेच्या हिशेबाने जाणून घ्या
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 23 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते, तर आज रू. 1 लाखाची रक्कम रू. 1.08 कोटी झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते, तर आज रू. 1 लाख रू. 11.34 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या रिटेल स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 4.33 लाख झाले असते.
तज्ज्ञही आहेत उत्साही
नोएल टाटा (Noel Tata) यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूहाची रिटेल ब्रँच (Tata Group Retail Stock) असलेल्या ट्रेंटने 85% वार्षिक (YoY) महसूल वाढीवर स्वतंत्र निव्वळ नफ्यात 79% वाढ नोंदवली आहे. ट्रेंटचा Q3FY22 महसूल त्यांच्या अंदाजापेक्षा पुढे होता, तर EBITDA ICICI सिक्युरिटीजच्या अपेक्षेनुसार होता.
कंपनीच्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज कंपन्याही या शेयरवर तेजीत आहेत. काही ब्रोकरेज हाऊसच्या मते, कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे ज्यामुळे त्यात गुंतवणूक केल्यास नफा (Earn Money Form Share Market) मिळू शकतो. त्याचे नवीनतम लक्ष्य रुपये 1,250 प्रति शेअर आहे.
Web Title :- Multibagger Stock Tata Group | tata group retail stock trent given 10713 percent return 1 lakh turn to 1 crore rupees should you buy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update