Multibagger Stock | 25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 3 स्टॉक्सने गुंतवणुकदारांना केले मालामाल, वर्षभरात मिळाला 14850% रिटर्न

नवी दिल्ली : Multibagger Stock | शेयर बाजार (Stock Market) मध्ये अनेक असे स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न दिला आहे. जर तुम्हाला शेयर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर, तुम्ही पेनी स्टॉकमध्ये (Penny stock) मध्ये गुंतवणुक करू शकता. पेनी स्टॉक (Multibagger Stock) त्यांना म्हणतात जे खुप स्वस्त असतात आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी असते. या शेयरची किंमत सामान्यपणे 25 रुपयांपेक्षा कमी असते.

वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांवर नजर टाकली तर दिग्गजांचे मत आहे की, इक्विटी बाजारच लाँग टर्ममध्ये बेस्ट परफॉर्मर बनून समोर येईल. या स्थितीमध्ये जर मागील 1 वर्षाचा बाजाराचा प्रवास पाहिला तर काही स्टॉक असे होते ज्यांनी या कालावधीत मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. असे 3 मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) जाणून घेवूयात :

1. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स

(Flomic Global Logistics) : 14850% रिटर्न मागील 1 वर्षात या शेयरमध्ये 14850 टक्के उसळी दिसून आली आहे. या कालावधीत या शेयरचा भाव 1 रुपयावरून वाढून 167.45 रुपयांवर आला आहे. हे सुद्धा जाणून घेतले पाहिजे की, हा स्टॉक एनएसईवर लिस्ट नाही आणि त्याचे मार्केट कॅप 120 कोटी रुपये आहे.

ही IATA संचालित एक एयरफ्रेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. कंपनी समुद्री वाहतुकीसह एयर, रेल्वे आणि दुसर्‍या माध्यमातून माल वाहतुकीची सेवा देते.
कंपनी सुमारे 30 वर्षापासून व्यवसाय करत आहे आणि 84 पेक्षा जास्त देशांसाठी सेवा उपलब्ध करते.

2. गोपाळा पॉलीप्लास्ट लिमिटेड

(Gopala Polyplast Ltd) : 10,903% रिटर्न 1 वर्षात हा शेयर 5.72 रुपयांनी वाढून 629.4 रुपयांवर पोहचला आहे.
या कालावधीत या स्टॉकने 10,903 टक्केचा रिटर्न दिला आहे. Gopala Polyplast Ltd HDPE/PP ने विनलेल्या गोणी किंवा बॅग बनवते.

कंपनीची क्षमता 7925 टन आहे. याशिवाय कंपनी इतर टेक्सटाईल प्रॉडक्टसाठी लेबल सुद्धा बनवते.
जे रेडिमेंट गार्मेंट, होजरी, टेरी टॉवेल, पदत्राणे आणि विनलेल्या कपड्यांवर लावले जातात.

3. एक्सप्रो इंडिया

(Xpro India) : 3145.54% की तेजी मागील 1 वर्षादरम्यान या शेयरमध्ये 3145.54 टक्के तेजी पहायला मिळाली आहे. शेयरची मागील क्लोजिंग प्राईस 691.3 रुपये आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलसंबंधी व्यापक शक्यता पाहता पुढेही या शेयरमध्ये तेजी येण्याचे संकेत आहेत. ही बिर्ला ग्रुपची एक कंपनी आहे.

कंपनीचे अनेक डिव्हिजन आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी युनिट आहेत. ही पॅकेजिंग व्यवसाय करणारी कंपनी आहे.
जिचे मार्केट कॅप 816 रुपये आहे. कंपनीच्या प्रॉडक्ट पोर्टफोलियोवर नजर टाकली तर कंपनी BOPP films, Coex cast films, coex sheets सारखे अनेक प्रॉडक्ट बनवते. (Multibagger Stock)

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Pune Crime | अपघात की घातपात ! पुण्यात पुरूष आणि महिलेचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ, मुंढवा परिसरातील घटना

Anil Deshmukh | मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना दणका ! पुन्हा ED च्या कोठडीत रवानगी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Multibagger Stock | these 3 multibagger stocks surged up to 14850 percent in just 1 year check list

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update