Multibagger Stock | वर्षभरापासून मोठी कमाई करून देत असलेला ‘हा’ स्टॉक खरेदी करण्याची अजूनही आहे का संधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | स्मॉल कॅप कंपनी फेज थ्री लिमिटेडचा (Faze Three Ltd.) शेअर एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर पैसे कमावून देत आहे. फेज थ्री हे होम टेक्सटाईल्स आणि ऑटोमोटिव्ह फॅब्रिक्सच्या निर्मितीमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. बाजारातील जाणकार सांगतात की, भारतीय टेक्सटाइल्स आणि फॅब्रिक्सची मागणी आता जागतिक स्तरावर वाढत आहे. चीनऐवजी आता जागतिक खरेदीदार भारताकडे वळू लागले आहेत. याचा आगामी काळात फेज थ्री लिमिटेडला खूप फायदा होईल. (Multibagger Stock)

 

फेज थ्री ही स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल रु. 834 कोटी आहे. कंपनीचे मार्च 2022 तिमाहीचे निकाल देखील उत्कृष्ट आहेत. कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक 44.53 टक्क्यांनी वाढून 157.06 कोटी रुपये झाले आहे.

 

गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 108.67 कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे, कंपनीच्या ईबीआयटीमध्ये 56.25 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 21.64 कोटी रुपये झाली आहे. (Multibagger Stock)

 

वार्षिक आधारावर कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स रु. 15.91 कोटी होता. मार्च 2021 च्या तिमाहीत तो 8.59 कोटी रुपये होता. अशा प्रकारे, वार्षिक आधारावर 85.22 टक्के वाढ झाली आहे.

एका वर्षात 246% रिटर्न
फेज थ्री लिमिटेडचा स्टॉक त्याच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न देत आहे. गेल्या वर्षभरात हा शेअर 246 टक्क्यांनी वधारला आहे. 24 मे 2021 रोजी या शेअरची किंमत 96.55 रुपये होती.

मंगळवार 24 मे 2022 रोजी या शेअरची किंमत 335 रुपये झाली आहे. वर्ष 2022 मध्ये, फेज थ्री स्टॉकने 15.80 टक्के रिटर्न दिला आहे, तर गेल्या सहा महिन्यांत तो 14.35 टक्के वाढला आहे.

फेज थ्री स्टॉकने 17 जानेवारी 2022 रोजी 413 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. सध्या, तो त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 18 टक्क्यांच्या सवलतीवर व्यवहार करत आहे. स्टॉकचे P/E गुणोत्तर 18.96 आहे, जे खूप जास्त आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्सचा मोठा हिस्सा आहे. प्रवर्तकांकडे एकूण 51.28 टक्के हिस्सा आहे.

ICICI ने दिले बाय रेटिंग
लाइव्ह मिंटमधील रिपोर्टनुसार, ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities) ने फेज थ्री लिमिटेड स्टॉकचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे.
ब्रोकरेजने त्याची टार्गेट प्राईस 405 रुपये केली आहे.

ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, सध्या कंपनी पूर्ण क्षमतेने काम करत आहे.
कंपनीचे ऑर्डर बुक हेल्दी आहे. चीनमधून डिमांड शिफ्टिंग होऊन आता भारतात येत आहे.
याचा फायदा कंपनीला मिळत आहे आणि मिळत राहील.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | this multibagger stock surges over 200 in1 year icici securities says to buy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा