Multibagger Stock | गुंतवणुकदारांमध्ये सुपरहिट आहे ‘ही’ म्युझिक कंपनी, एक वर्षात 700 टक्केपेक्षा जास्त दिला ‘रिटर्न’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | मागील काही काळापासून मनोरंजन क्षेत्रातील शेयर्स (Entertainment stocks) ने सुद्धा गुंतवणुकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. आज आम्ही अशाच कंपनीबाबत सांगणार आहोत. देशातील प्रसिद्ध म्युझिक कंपनी सारेगामा (music company Saregama) गुंतवणुकदारांमध्ये सुद्धा सुपरहिट आहे. जिने मागील एका वर्षात 700 टक्केपेक्षा जास्त रिटर्न (Multibagger Stock) दिला आहे.

 

एक वर्षापूर्वी जो शेयर (Multibagger Stock) तीन डिजिटचा होता, त्याची व्हॅल्यू चार डिजिटमध्ये गेली आहे. जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक वर्षापूर्वी 50 हजार रुपयांची गुंतवणुक केली असती तर त्याचे मूल्य 4 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. या स्टॉकबाबत जाणून घेवूयात…

700 टक्केपेक्षा जास्त दिला आहे रिटर्न
बीएसईकडून (BSE) मिळालेल्या आकड्यानुसार सारेगामाच्या शेयर (Shares of Saregama) ने ऑक्टोबर 2020 पासून ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान 715 टक्केचा रिटर्न दिला आहे. 16 ऑक्टोबरला कंपनीचा शेयर 550 रुपयांचा होता, जो 13 ऑक्टोबरला 4484 रुपयांवर आला आहे. याचा अर्थ आहे की, या शेयरमध्ये सुमारे 3900 रुपयांची तेजी पहायला मिळाली आहे. याचा अर्थ आहे की कंपनीने गुंतवणुकदारांना 8 पटपेक्षा जास्त कमाई करून दिली आहे.

50 हजार रुपये झाले 4 लाखांपेक्षा जास्त
गुंतवणुकदारांना कमाई करून देण्यात या शेयरने कोणतीही कसर सोडली नाही.
जर एखाद्या छोट्या गुंतवणुकदाराने एक वर्षापूर्वी 50 हजार रुपयांची गुंतवणुक केली असती
तर तर त्याची व्हॅल्यू 4 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. तर एक लाख रुपयांची गुंतवणुक केली असती तर 8 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
जाणकारांनुसार आगामी दिवसात आणखी वाढ होऊ (Multibagger Stock) शकते.

 

आज शेयरमध्ये दिसत आहे घसरण
सारेगामाच्या शेयरमध्येआज 2 वाजता 0.50 टक्के म्हणजे 25 रुपये प्रति शेयरची घसरण दिसून आली.
ज्यामुळे कंपनीचा शेयर 4350 रुपयांवर व्यवहार करत आहे. आज कंपनीचा शेयर 4370 रुपयांवर खुला झाला होता
आणि 4200 रुपयांसह दिवसाच्या लोएस्ट प्राईसवर पोहचला होता.
याचा अर्थ आहे की कंपनीचा शेयर ऑल टाइम हायपासून 150 रुपयांपेक्षा जास्त घसरला आहे.

 

Web Title :- Multibagger Stock | this music company is a super hit among investors gave returns of more than 700 percent in one year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP Vs Shivsena | भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर; ‘… त्यांच्याच कौतुकाच तुणतुणं वाजवत फिरायची शिवसेनेवर वेळ आली’

Salman Khan | सलमान खानने मुंबईत घेतले डुप्लेक्स घर; भाडे म्हणून द्यावे लागणार महिन्याला तब्बल ‘इतके’ लाख रुपये

Pune Crime | MSEB च्या डी. पीमधून तांब्याची तार चोरणारे दोन जण गजाआड, 101 किलो तांबे जप्त