Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले ‘मालामाल’, महिनाभरात दिला मल्टीबॅगर रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Stock | शेयर बाजार (Stock market) च्या गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी आहे. जर तुम्ही दिग्गज गुंतवणुकदार आशीष कोचालिया यांचा पोर्टफोलियो फॉलो करून शेयरमध्ये पैसे लावत असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. आशीष कोचालिया (Ashish kochalia) यांना असे स्वस्त शेयर निवडण्यासाठी ओळखले जाते जे बेंचमार्क इंडेक्सवरून चांगली कामगिरी (Multibagger Stock) करतात.

 

Gateway Distriparks हा आशीष कोचालिया यांच्या पोर्टफोलियोमध्ये सहभागी असाच एक स्टॉक आहे.
हा स्टॉक 2021 च्या अशा मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी आहे ज्याने यावर्षी आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्केपेक्षा जास्त रिटर्न (Multibagger Stock) दिला आहे.

 

मार्केट एक्सपर्ट या स्टॉकवर बुलिश आहेत आणि गुंतवणुकदारांना घसरणीत खरेदीचा सल्ला देत आहेत. एक्सपर्टचे म्हणणे आहे की,
पुढील काही दिवसात या स्टॉकमध्ये नफावसूली पहायला मिळेल. अशावेळी हा स्टॉक खाली येईल. तेव्हा यामध्ये खरेदीची चांगली संधी असेल.

 

6 महिन्यात 291 रुपयांवर पोहचला शेयर

 

मागील 1 महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) 1 महिन्यात 261.55 रुपयांनी वाढून 291 रुपयांवर पोहचला आहे.
या कालावधीत या शेयरने सुमारे 12 टक्केचा रिटर्न दिला आहे. मागील 6 महिन्यात हा स्टॉक 257.10 रुपयांनी वाढून 291 रुपयांवर पोहचला आहे.
या कालावधीत त्याने 14 टक्के रिटर्न दिला आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत या शेयरने 121.20 रुपयांवरून आपला प्रवास सुरु करून 291 रुपयांची वाढ दाखवली आहे.

 

जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट?

 

चॉईस ब्रोकिंगचे सुमित बागडिया यांचे म्हणणे आहे की, या स्टॉकमध्ये घसरणीत 280 रुपयांच्या जवळपास खरेदी केली पाहिजे.
शॉर्ट टर्ममध्ये यामध्ये 320-330 रुपयांचा स्तर पहायला मिळू शकतो. या खरेदीसाठी 260 रुपयांचा स्टॉपलॉस आवश्य लावा.
Gateway Distriparks मध्ये आशीष कोचालिया यांची भागीदारी 19,17,606 शेयरची आहे जी कंपनीने जारी केलेल्या त्यांच्या भांडवलाच्या 1.54 टक्के आहे.

 

Web Title : Multibagger Stock | this stock of ashish kochalia made investors rich gave multibagger returns in a month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुणे शहरातील विविध न्यायालयात कार्यरत असणाऱ्या दोन बनावट जामीनदार देणार्‍या टोळ्या गजाआड, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 37 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

PMRDA | मनपा निवडणुकीत स्वबळाचा नारा देणार्‍या कॉंग्रेसला झटका; गटातटाच्या राजकारणात PMRDA नियोजन समितीची एकमेव जागा निवडूण आणण्यात ‘अपयश’