Multibagger Stock | ‘या’ शेअरमधून मिळतोय उत्कृष्ट परतावा; 1 लाखाचे झाले 10 लाख, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Stock | अनेक छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांच्या (Investors) नजरा चांगला परतावा मिळण्याकडे लागल्या असतात. त्यामुळे गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये (Stock Market) अनेक पर्याय शोधत असतात. मात्र, दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना (Dolly Khanna) यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकही (Tinna Rubber And Infrastructure Share) गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. या शेअरने 2021 साली मल्टीबँगर परतावा (Multibagger Stock) दिला आहे. त्याचबरोबर 2022 मध्ये देखील त्याच गतीने सुरू आहे. (Share Market Marathi News)

 

टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीतील शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांचे चेन्नई (Chennai) स्थित कंपनीत 1,37,057 शेअर्स अथवा 1.60 टक्के स्टेक आहेत. कमी प्रसिद्ध अथवा लोकांच्या नजरेमध्ये नसलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ते खुप गुंतवणूक करतात. 2021 मध्ये, टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा दिला. (Multibagger Stock)

 

28 एप्रिल 2021 रोजी शेअरची किंमत 34.05 रुपये होती. त्याच वेळी, 25 एप्रिल 2022 रोजी, हा स्टॉक इंट्राडे मध्ये 350 रुपयांवर पोहोचला. अशाप्रकारे या शेअरने मागील वर्षभरात 900 टक्के परतावा दिलाय. मागील ६ महिन्यांतही या शेअरने चांगली कामगिरी केलीय. या शेअरने या कालावधीत 163 टक्के परतावा दिलाय. त्याचबरोबर 2022 मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 83.21 टक्के परतावा दिला आहे

 

1 लाख रुपये झाले 10 लाख..

मागील 1 वर्षापासून हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर पैसे कमावून देतेय. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज ती गुंतवणूक 1.23 लाख रुपयांमध्ये झाली असती. तसेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.65 लाख रुपये झाले आहेत. तर, एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (Tinna Rubber And Infrastructure Share) शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, तर आज त्याची गुंतवणूक दहा लाख रुपये झालीय.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | tina rubber infrastructure gave multibagger returns 1 lakh investment become 10 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा