Multibagger Stock Tips | 2021 मध्ये ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणुकदारांचे पैसे केले 3 पट; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock Tips | 2021 मध्ये शेयर मार्केट (Share Market) आता आपल्या सर्वोच्च स्तरावर पोहचले आहे. अशावेळी अनेक स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉक मल्टीबॅगर (Multibagger Stock Tips) मध्ये बदलले आहेत. यापैकी एक विजय केडिया (Vijay Kedia) पोर्टफोलियोचा स्टॉक एल्कॉन इंजिनियरिंग (Elecon Engineering) आहे. या स्टॉकने आपल्या शेयरधारकांना 2021 मध्ये आतापर्यंत 300 टक्के रिटर्न दिला आहे. शेयर बाजाराच्या जाणकारांनुसार हा मल्टीबॅगर स्टॉक अजून वर जाऊ शकतो.

एल्कॉन इंजिनियरिंग शेयरचा मागील रेकॉर्ड

या मल्टीबॅगर स्टॉकने अलिकडच्या व्यवहार सत्रात नफा वसूली पाहिली आहे, कारण मागील एक महिन्यात आपल्या शेयरधारकांना जवळपास 3.34 टक्के रिटर्न दिला आहे.
मागील 6 महिन्याचा रेकॉर्ड पाहता, हा स्टॉक 162 टक्केच्या वाढीसह 63.50 रुपयांवरून वाढून 167.60 रुपये झाला आहे.
यावर्षी (Year to Date) हा इंजिनियरिंग शेयर 42.60 वरून वाढून 167.60 प्रति शेयर स्तरावर पोहचला आहे.
याच कालावधीत जवळपास 300 टक्केची वाढ झाली आहे. (Multibagger Stock Tips)

 

हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे आहे का?

शेयर मार्केटच्या जाणकारांनुसार सध्या हा स्टॉक खुप चांगल्या वेगाने पुढे आहे.
पुढील काही महिन्यात या शेयरमधून चांगला रिटर्न मिळण्याची आशा आहे.
आता या स्टॉकची किंमत 167 प्रति स्टॉक आहे, जी पुढील काही महिन्यात 200 पर्यंत पोहचू शकते.
परंतु गुंवणुक दिर्घकाळासाठी असणे चांगले ठरू शकते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stock Tips | multibagger stock tips this multibagger stock gave 300 percent return to investors in 2021 know it s previous record

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 136 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Essential Supplements For Women | महिलांनी 30 च्या वयात आवश्य घेतले पाहिजेत ‘हे’ 5 सप्लीमेंट्स

Ashish Shelar | आमदार आशिष शेलारांकडून सूचक विधान, म्हणाले – ‘2 पक्षांकडून भाजपाला संकेत मिळताहेत’