Multibagger Stock | 4 रुपयांवरून रू. 2,439 वर पोहचला Tata Group चा हा शेयर, गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले रू. 5.70 कोटी, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | जर तुमच्यात संयम असेल तर तुम्ही शेअर बाजारातूनही करोडपती होऊ शकता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी, ’खरेदी करा, होल्ड करा आणि विसरून जा’ या धोरणाचा अवलंब करण्याशिवाय श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही. म्हणून, एखाद्याने दीर्घकाळ स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण स्टॉकमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न (Stock Return) मिळू शकतो. टाटा समूहाची कंपनी टायटन (Titan) चे शेअर्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या शेयरने 23 वर्षांत 57,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

टायटन शेअर पॅटर्न हिस्ट्री (Titan Share Price)
टाटा समूहाचा हा शेयर रु. 4.27 (NSE वर 1 जानेवारी 1999 रोजी बंद किंमत) वरून रु. 2,436.55 (NSE वर 8 फेब्रुवारी 2022 ची किंमत) पर्यंत वाढला आहे. म्हणजेच 23 वर्षांच्या या कालावधीत टायटन (Tata Group stock) च्या स्टॉकने सुमारे 57,041.69 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

गेल्या 10 वर्षात, या स्टॉकचा दर रु. 210.15 (4 जून 2012 ची शेवटची किंमत) वरून रु. 2,436.55 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेयरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,059.6 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. 10 फेब्रुवारी 2017 रोजी म्हणजे 5 वर्षांपूर्वी, NSE वर Titan च्या शेअरची किंमत 432 रुपये होती. आजच्या शेअरच्या किमतीनुसार, या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 464.80 टक्के रिटर्न दिला आहे.

गेल्या 1 वर्षाचा विचार करता, हा स्टॉक रु 1541.70 (8 फेब्रुवारी 2021 ची NSE वर बंद किंमत) वरून 2,436.55 (8 फेब्रुवारी 2022) पर्यंत वाढला आहे. या कालावधीत शेयर 58.26 टक्क्यांनी वधारला आहे. मात्र, वर्ष – दर – वर्ष आधारावर, टायटनचा स्टॉक 3.32 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, हा स्टॉक एका महिन्यात 8.19 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, टायटनचे शेअर्स आज 1.28 टक्क्यांनी वधारले आहेत.

रकमेनुसार समजून घ्या किती झाला नफा ?
टायटनच्या शेअर प्राईस पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 23 वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज रू. 5.70 कोटी झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 11.56 लाख झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 5.64 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती आणि या कालावधीपर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.58 लाख झाले असते.

शेअर्स 2,820 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात
टायटनचा हा शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock) यांचा आवडता स्टॉक आहे.
टायटन कंपनी (Titan company) च्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, झुनझुनवाला यांच्याकडे 3,57,10,395 शेअर्स आहेत जे 4.02 टक्के शेअर्सच्या समतुल्य आहेत. (Multibagger Stock)

त्याच वेळी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के हिस्सा आहे.
झुनझुनवाला दाम्पत्याची टायटनमध्ये 5.09 टक्के हिस्सेदारी आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत टायटनचा शेयर 2,500 रुपयांपर्यंत (Titan share target price) जाऊ शकतो.
दीर्घ मुदतीत तो रु. 2,820 पर्यंत पोहोचू शकतो. राकेश झुनझुनवाला यांनी टायटनच्या स्टॉकमधून 3 महिन्यांत जबरदस्त कमाई केली आहे.

 

Web Title :- Multibagger Stock | titan tata group stock delivered huge return 56000 percent in 23 year 1 lakh turn to 5 crore rupee

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा