Multibagger Stock | सप्टेंबरमध्ये 100 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणारे ‘हे’ Top-5 स्टॉक्स, जाणून घ्या तुमच्याकडे आहेत का हे शेयर?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | भारतीय शेयर बाजारासाठी मागील सप्टेंबर महिना स्मरणीय ठरला. सेन्सेक्सने या महिन्यात 60 हजारचा ऐतिहासिक स्तर गाठला. भारतीय शेयर बाजारात सप्टेंबर सुद्धा बुलरन ठरला. या दरम्यान काही ए-लिस्टेड शेयर (A-listed stocks) ने शानदार रिटर्न (excellent returns) दिला. या कंपन्यांच्या शेयरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले. मागील महिन्यात सर्वात जास्त रिटर्न देणार्‍या 5 ए-लिस्टेड शेयरबाबत (Multibagger Stock) जाणून घेवूयात.

1. Zee Entertainment Entreprise Limited (ZEEL) :
मागील महिन्यात हा स्टॉक तेव्हा चर्चेत आला जेव्हा बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनी कंपनीचे 50 लाख शेयर 200.40 प्रति शेयरच्या भावाने खरेदी केले. नंतर, सोनीसोबत मर्जर डिलच्या घोषणेनंतर तर स्टॉकने सर्व अडथळे दूर केले आणि याचा भाव सप्टेंबर 2021 मध्ये 171.65 रुपयांवरून वाढून 303.20 रुपये प्रति शेयरवर पोहचला. अशाप्रकारे मागील महिन्यात जवळपास 77 टक्केचा शानदार रिटर्न दिला आहे.

2. Gujarat Alkalies :
हा केमिकल स्टॉक सप्टेंबर 2021 मध्ये 454.50 रुपयांवरून वाढून 672.75 रुपयांवर पोहचला. या दरम्यान यामध्ये सुमारे 50 टक्के वाढ नोंदली गेली. हा स्टॉक यावर्षीच्या मल्टीबॅगर शेयर (Multibagger Stock) च्या यादीत सहभागी आहे. त्याने 2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत 110 टक्केचा रिटर्न दिला आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीच्या दरम्यान या स्टॉकमध्ये मोठी विक्री दिसून आली आणि मार्च 2020 मध्ये तो 210 रुपये प्रति शेयरच्या दरावर आला होता. मात्र, त्यानंतर स्टॉकने (Stock Market) मजबूत पदार्पण कले आणि मागील दिड वर्षात गमावलेले मूल्य पुन्हा मिळवले.

3. Vodafone Idea :
31 ऑगस्ट 2021 ला हा टेलीकॉम पेनी स्टॉक 6.10 प्रति शेयरच्या भावावर बंद झाला होता. मात्र 30 सप्टेंबर 2021 ला NSE वर त्याची किंमत सुमारे 11.90 रुपये प्रति शेयर होती. याचा अर्थ आहे की, सप्टेंबर महिन्यात या स्टॉकने सुमारे 95 टक्के रिटर्न दिला आहे. या तेजीच्या पाठीमागे कंपनीच्या प्रमोटर्सची कंपनीत गुंतवणूक करण्याची घोषणा आणि त्यानंतर भारत सरकारकडून AGR थकबाकीच्या पेमेंटबाबत टेलिकॉम कंपन्यांना 4 वर्षांची सवलत देणे मोठे कारणे ठरले.

4. Surya Roshni :
रियल इस्टेट सेक्टरमध्ये आलेल्या तेजीचा पेन्ट आणि इलेक्ट्रिक अप्लायन्सेस शेयरवर सुद्धा परिणाम दिसून आला. सूर्या रोशनीचा शेयर सप्टेंबर महिन्यात 529.20 रुपयांच्या भावावरून वाढून 820.10 रुपयांच्यावर पोहचला. मागील एक महिन्यात यामध्ये सुमारे 55 टक्केची तेजी आली. हा स्टॉक यावर्षीच्या मल्टीबॅगर शेयरच्या यादीत सहभागी आहे.

कारण त्याने मागील 6 महिन्यात 130 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. तर 2021 च्या सुरुवातीपासून त्याने आतापर्यंत शेयरधारकांना सुमारे 125 टक्के रिटर्न दिला आहे. तर मागील वर्षात त्याने सुमारे 300 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. फेब्रुवारी 2018 ते एप्रिल 2020 पर्यंत हा शेयर दबावात राहिला होता, परंतु त्यानंतर यामध्ये तेजी दिसत आहे.

5. Dish TV India :
हा शेयर 31 ऑगस्ट 2021 ला 12.60 रुपये प्रति शेयरच्या स्तरावर बंद झाला होता.
मात्र, सप्टेंबर महिन्यात यामध्ये सुमारे 63 टक्केची तेजी आली आणि तो 30 सप्टेंबर 2021 ला NSE वर 20.50 रुपये प्रति शेयरच्या भावावर बंद झाला.
तो सुद्धा 2021 च्या मल्टीबॅगर शेयरपैकी एक आहे. मागील सहा महिन्यात त्याने आपल्या शेयरधारकांना सुमारे 101 टक्के रिटर्न दिला आहे.
मात्र, 2021 च्या सुरूवातीला या स्टॉकमध्ये मोठी व्रिकी दिसून आली होती. (Multibagger Stock)

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.

Web Title :- Multibagger Stock | top 5 stocks giving 100 return in september know do you have shares too

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad News | स्वत:ची किडनी देऊन आईने वाचवले मुलाचे प्राण, रक्तगट वेगळा असूनही केली किडनी दान अन्…

Pune Crime | नशा करण्यासाठी पैसे न देणार्‍या 56 वर्षीय आजीवर नातवाकडून चाकू हल्ला, पुण्यातील घटना

Aryan Khan Arrest | अखेर ‘किंग खान’ शाहरूखचा मुलगा ‘आर्यन’ला ड्रग्ज पार्टी प्रकरणी NCB कडून अटक