Multibagger Stocks | 10 हजारांचे झाले 36 लाख; दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टाॅकने करून दिली कमाई, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Multibagger Stocks | अनेकजण व्यवसाय म्हणून चांगल्या परताव्याच्या गुंतवणूकीकडे (Investment) लक्ष देत असतात. यादरम्यान अनेक लहान गुंतवणुकीच पर्याय देखील उपलब्ध असतो. अनेक शेअर्समध्ये देखील चांगला परतावा मिळावा याकडे अनेक गुंतवणुकदारांच्या (Multibagger Stocks) नजरा लागले असतात. तर, अवंती फीड्सच्या शेअर्सचा 5 (Avanti Feeds Shares) 2 आठवड्यांचा उच्चांक 675 रुपये आहे. तसेच, शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 411.85 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 8,100 कोटी रुपये आहे.

 

हा स्टाॅक अवंती फीड्स लिमिटेड (Avanti Feeds) या कंपनीचा आहे. कमी किंमत असलेल्या एका स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. अवंती फीड्सच्या शेअर्सने अवघ्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना श्रीमंत केलेय. कंपनीच्या शेअर्सची कामगिरी इतकी चांगली आहे की काही हजार रुपये गुंतवणारे नागरीकही कोट्यधीश झालेत. (Multibagger Stocks)

 

“अवंती फीड्सचा स्टॉक (Avanti Feeds Shares) एकदा दोन रुपयांपेक्षा कमी होता आणि त्याने आता नागरीकांना 36,000 टक्क्यांहून जादा परतावा दिले आहेत. दरम्यान, 11 फेब्रुवारी 2010 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) अवंती फीड्सचे शेअर्स 1.65 रुपये इतके होते. 11 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 596.55 रुपयांच्या पातळीवर आहेत.

कंपनीच्या शेअर्सनी मागील बारा वर्षांत साधारण 36,150 टक्के परतावा दिले आहेत.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 11 फेब्रुवारी 2010 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 10 हजार रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल,
तर आजच्या तारखेनुसार त्याची ती रक्कम 36.15 लाख रुपये इतकी झाली असती.
समजा एखाद्या व्यक्तीने 11 फेब्रुवारी 2010 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याची सध्याचा भाव 3.6 कोटी रुपयांच्या साधारण गेली असती. (Multibagger Stocks)

 

दरम्यान, अवंती फीड्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 675 रुपये आहे.
तसेच, शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 411.85 रुपये आहे.
कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 8,100 कोटी रुपये आहे. या शेअर्सचे ऑल टाईम रिटर्न 112,320 टक्के आहे.
एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 53 पैशांवर देखील गेले होते.

 

 

Web Title :- Multibagger Stocks | 10 thousand became 36 lakhs shares worth less than rs 2 now above 500 investors got lakhs and crores

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Suspension Revoked | अखेर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे, राज्य सरकारचा निर्णय

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 335 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Kirit Somaiya in PMC | किरीट सोमय्या यांच्या ‘पायर्‍यांवरील’ सत्कारावेळी महापालिका भवनला पोलिस छावणीचे स्वरुप; सर्वसामान्य नागरिकांना व कर्मचार्‍यांनाही महापालिकेत प्रवेश बंदी केल्याने दिवसभर काम ठप्प (व्हिडीओ)