Multibagger Stocks | स्वस्तात मिळत आहेत Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलियोचे शेयर, चांगल्या रिटर्नची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stocks | मागील काही दिवसांपासून शेयर बाजारात (Stock Market) घसरण जारी आहे, ज्यामुळे अनेक चांगले स्टॉक (Multibagger Stocks ) सध्या डिस्काऊंटवर सुरू आहेत. आज आम्ही काही अशा स्टॉकबाबत सांगणार आहोत जे शेयर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी सुद्धा खरेदी केले आहेत आणि ते स्टॉक डिस्काऊंटवर आहेत.

 

हे स्टॉक वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसेसच्या फेव्हरेट लिस्टमध्ये सुद्धा आहेत. यात प्रामुख्याने 4 मोठे शेयर आहेत.
ज्यामध्ये टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications), ओरिएंट सिमेंट (Orient Cement), एनसीसी लिमिटेड (NCC Ltd.) आणि लूपिन लिमिटेड (Lupin Limted) चा समावेश आहे.

 

टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications)

 

याच वर्षी 19 ऑक्टोबरला टाटा कम्युनिकेशनमध्ये 1540 रुपयांचा हाय लावण्यात आला होता.
परंतु आज (22 नोव्हेंबर 2021 ला) हा स्टॉक 1,222 रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेज हाऊस एम.के. ग्लोबलने या शहरात पोझीशन बनवण्याचा सल्ला दिला आहे आणि यासाठी 1700 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.

 

याचा अर्थ असा आहे की, येत्या काही काळात हा स्टॉक जवळपास 39 टक्के रिटर्न देऊ शकतो.
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीची 1.1 टक्के भागीदारी आहे आणि त्यांच्या स्टॉकचे व्हॅल्यूएशन 381.3 कोटी रुपये सांगण्यात आले आहे. (Multibagger Stocks )

 

ओरिएंट सिमेंट (Orient Cement)

 

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे ओरिएंट सिमेंट कंपनीत 1.2% ची भागीदारी आहे आणि त्यांच्या शेयरची व्हॅल्यू 40 कोटी रुपये आहे.
ब्रोकरेज हाऊस अ‍ॅक्सिस सिक्युरिटिजने या शेयरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

 

अ‍ॅक्सिस सिक्युरिटजनुसार सध्या 157.40 वर ट्रेड करत असलेला हा स्टॉक काही काळातच 30% पर्यंत रिटर्न देऊ शकतो.
यासाठी 210 रू. चे टार्गेट दिले गेले आहे. ओरिएंट सिमेंटने 8 नोव्हेंबरलाच NSE वर 185.55 चा हाय लावला होता. (Multibagger Stocks )

 

एनसीसी लिमिटेड (NCC Ltd.)

 

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एनसीसी लिमिटेडच्या स्टॉकने 9 फेब्रुवारी 2021 ला 99.85 रुपयांचा हाय केला होता.
आज 22 नोव्हेंबर 2021 ला हा स्टॉक 74.60 रुपयांवर बंद झाला आहे. एकुण जवळपास 25 टक्के कमजोर झाला आहे.

 

ब्रोकरेज हाऊस जियोजीतने या शेयरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. टार्गेट 103 रुपये ठेवले आहे.
म्हणजे यामध्ये 37 टक्केपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीची 12.8 टक्के भागीदारी आहे.
त्यांच्या पोर्टफोलियोमध्ये कंपनीचे 78,333,266 शेयर आहेत, ज्यांची व्हॅल्यू 589 कोटी रुपये आहे.

 

लूपिन लिमिटेड (Lupin Limted)

 

कंपनीचा हा स्टॉक आपल्या 1 वर्षाच्या हाय 1268 रुपयांवरून करेक्ट होऊन 880 रुपयांवर ट्रेड करत आहे.
शेयरमध्ये 5 दिवसात 7 टक्केच्या जवळपास घसरण दिसून आली आहे. ब्रोकरेज हाऊस शेयरखानने या शेयरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
टार्गेट 1210 रुपये ठेवले आहे. करंट प्राईसच्या दृष्टीने यामध्ये 26 टक्केपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो.
राकेश झुनझुनवाल यांच्याकडे कंपनीतील एक टक्केपेक्षा जास्त भागीदारी आहे.

 

Web Title : Multibagger Stocks | experts give buy tag to this multibagger stocks from rakesh jhunjhunwala portfolio

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

IISER Pune Recruitment 2021 | पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये भरती; पगार 42,000 रूपयांपर्यंत

Darwin Electric Scooter | डार्विनची नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर ! अवघ्या 68,000 रुपयात खरेदी करता येणार; शानदार फिचर्सही मिळणार