Multibagger Stocks | 4 रुपयांच्या शेअरची दररोज वाढत आहे खरेदी, 52 आठवड्यांची सर्वोत्तम कामगिरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारात (Share Market) असे अनेक शेअर्स आहेत ज्यांची किंमत किरकोळ आहे पण कामगिरी जबरदस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड Housing Development Infrastructure Limited (HDIL) या रिअल इस्टेट कंपनीच्या बाबतीतही असेच घडत आहे. एचडीआयएलच्या स्टॉकमधील तेजीचे सत्र असे सुरू आहे की तो आता 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. याचा अर्थ 52 आठवड्यांत स्टॉकने (Stock Market) इतकी चांगली कामगिरी केली नव्हती. (Multibagger Stocks)

 

शेवटच्या ट्रेडिंग दिवसाबद्दल बोलायचे तर, बीएसई निर्देशांकावर HDIL च्या शेअरची किंमत 4.87 टक्क्यांनी वाढून 7.32 रुपये झाली आहे. हे देखील महत्त्वाचे आहे की 2 मार्च रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 4.01 रुपये होती, जी 52 आठवड्यांची नीचांकी आहे. म्हणजेच 15 दिवसांत कंपनीने उच्च आणि निम्न दोन्ही स्तर पाहिले आहेत. यामागचे कारण काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वास्तविक, HDIL ची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांचा अदानी समूह (Adani Group) ही कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत आहे.
याशिवाय इतर अर्जदारांमध्ये शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन लिमिटेड (Sharda Construction and Corporation Limited),
बी – राईट रिअल इस्टेट लिमिटेड (B – Right Real Estate Limited),
देव लँड अँड हाऊसिंग लिमिटेड (Dev Land & Housing Limited),
अर्बन अफोर्डेबल हाउसिंग आणि टोस्कॅनो इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (Urban Affordable Housing & Toscano Infrastructure Private Limited) यांचा समावेश आहे. (Multibagger Stocks)

 

21 मार्च रोजी बैठक :
21 मार्च रोजी HDIL च्या कर्जदारांची 24 वी बैठक होणार आहे. यापूर्वी 9 – 10 मार्च रोजी बैठक झाली होती.

 

Web Title :- Multibagger Stocks | hdil stock price increase firm insolvency gautam adani led adani group financial creditors meeting

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा